गोंदिया - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेले, गोंदियातील नागराधाम येथील महादेवाचे मंदिर आज भाविकांसाठी खुले करण्यात आले. हर हर महादेवाचा गजर करत भक्तांनी पहाटे 5 वाजता मंदिरात प्रवेश केला. तब्बल 8 महिन्यानंतर आज मंदिर उघडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील नागरा येथे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे. या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भाविकांसोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगडमधून देखील भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 महिन्यांपासून बंद असणारे राज्यातील मंदिरे आजपासून सुरू करायला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परवानगी मिळताच आज नागरामधील हे महादेवाचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. पहाटे पाच वाजता मंदिराच्या मुख्य पूजाऱ्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले केले. त्यानंतर शंकराचे पाहिले दर्शन घेणाऱ्या महिला भक्ताला पुजाऱ्याने नारळ, फुले आणि उपरणे देऊन त्यांचा सत्कार केला. दरम्यान प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन भाविकांकडून होताना दिसत आहे. तसेच मंदिर प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेतली जात आहे. तब्बल आठ महिन्यानंतर मंदिर सुरू झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - पहाटेच्या काकड आरतीने साई मंदिर खुले, पहिल्याच दिवशी दर्शन व्यवस्थेचा फज्जा
हेही वाचा - देहू नगरीत तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा