ETV Bharat / state

Mahashivaratri yatra at Pratapgadh : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त हजारो भाविकांची गर्दी

राज्यात कोरोनाची तिसरी लाट पाहता महाराष्ट्रातील महाशिवरात्री निमित्य भरणाऱ्या यात्रेला जिल्हा प्रशासनकडून बंदी घालण्यात आली होती. तरीही गोंदिया जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेल्या प्रतापगड यात्रेला आज (दि. 1 मार्च) सकाळपासूनच असंख्य भाविकांची गर्दी दिसून ( Mahashivaratri yatra at Pratapgadh ) आली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 1, 2022, 6:35 PM IST

गोंदिया - राज्यात कोरोनाची तिसरी लाट पाहता महाराष्ट्रातील महाशिवरात्री निमित्य भरणाऱ्या यात्रेला जिल्हा प्रशासनकडून बंदी घालण्यात आली ( Mahashivaratri yatra at Pratapgadh ) होती. तरीही गोंदिया जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेल्या प्रतापगड यात्रेला आज (दि. 1 मार्च) सकाळपासूनच असंख्य भाविकांची गर्दी दिसून आली.

महाशिवरात्री यात्रेनिमित्त हजारो भाविकांची गर्दी

मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्रतापगड येथे भगवान शंकराचे मंदिर असून ख्वाजा उस्मान गनी हारुन यांची दर्गाह आहे. हिंदू-मुस्लिम ऐकाचे प्रतिक म्हणून प्रतापगडाकडे पाहिजे जाते. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, मागील दोन वर्षांपासून यात्रा रद्द करण्यात आल्या असून यंदाही प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली होती. मात्र, हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी हजर होते. इतकेच नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनीही या ठिकाणी हजेर लावली होती. कोरोना बाबतचे कोणतेही नियम या ठिकाणी पाळले जात नव्हते. यामुळे स्थानिक प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येतात. प्रतापगडाच्या पायथ्याशी आपली वाहने लावून तब्बल पाच किलोमिटर पायपीट करुन गड चढतात. या ठिकाणी असलेले मंदिर व दर्गाह येथे जाऊन दर्शन घेतात व प्रार्थना करतात. या ठिकाणी नाना पटोले यांनी मंदिरात जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले व दर्ग्यात जाऊन चादर चढवली.

हेही वाचा - गोंदिया येथील बिरसी विमानतळातून १३ मार्च रोजी हवाई वाहतूक होणार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.