गोंदिया - कोरोनाच्या धास्तीने सोशल मीडियावर फैलावत असणाऱ्या अफवांमुळे कोंबडीचे मास खाणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. गोंदियात कुक्कुटपालन व्यावसायिकांनी एकत्र येत कोंबड्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
चिकनपासून कोरोना होत नाही, याबाबतीत जनजागृती केली जाते. मात्र, ही भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे होळी सारख्या सणाला देखील कोंबडीच्या मांसाला अपेक्षित अशी मागणी नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसत असून मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. झालेला खर्च तरी काढायचा कसा? हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे.
हेही वाचा - एसटी महामंडळाचे जिल्हा परिषदेकडे ९ लाख थकीत; २०१५ च्या निवडणुकीतील रक्कम
दरम्यान, कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, विक्रीकरिता तयार असलेला माल योग्य भावात सरकारने उचलावा. कुक्कुटपालनासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करावे, परप्रांतातून येणाऱ्या कोंबड्यावर बंदी घालण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास सरकारी कार्यालयांमध्ये हजारो जिवंत कोंबड्या सोडून देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - गोंदियात आढळला कोरोनाचा संशयित; आज अहवाल होणार प्राप्त