ETV Bharat / state

मोकाट कुत्र्यांच्या तावळीतून चितळाची सुटका - मोकाट कुत्र्यांचा चितळवर हल्ला

एक चितळ आज पाण्याच्या शोधासाठी शहराकडे आला. त्याच्यावर शहरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला.

chital
मोकाट कुत्र्यांच्या तावळीतून चितळाची सुटका
author img

By

Published : Mar 16, 2021, 6:59 PM IST

गोंदिया - जिल्हा हा वनाने नटलेला असून या जिल्ह्यात अनेक वन्य प्राणी आहेत. सद्य उन्हाला सुरवात झाली असून, वन्य प्राणी अनेकदा पाण्याच्या शोधासाठी भटकत शहराकडे येतात. असाच एक चितळ आज पाण्याच्या शोधासाठी शहराकडे आला. त्याच्यावर शहरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. हे बघताच स्थानिकांनी त्या मोकाट कुत्र्यांच्या तावळीतून त्या चितळाला वाचवले.

हेही वाचा - गोकुळच्या निवडणुकीत भाजपला प्रतिनिधित्व द्या- चंद्रकांत पाटील

उन्हाळा सुरु होताच वन्य प्राण्यांची लोकवस्तीकडे धाव

गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहराला लागून असलेल्या नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या देवरी तालुक्यात वन्यप्राणी नेहमीच संचार करताना बघायला मिळतात. मात्र, उन्हाळ्याची चाहुल लागताच आणि जंगलात वनवे नसल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत असतात. असाच आज एक चितळ जंगलातून देवरी शहरकडे येत असताना त्या चितळावर मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करत त्या चितळाचे लचके तोडत. यावेळी देवरीतिल काही युवक क्रिकेट खेळत असताना त्यांना हे दिसताच त्यांनी त्या मोकाट कुत्र्यांच्या तावळीतून त्या चितळाची सुटका केली. त्या जखमी चितळाला सुरक्षित ठिकाणी आणून वन विभागाला याची माहिती दिली. वन विभाग आपल्या चमूसह घटनास्थळी पोहचत त्या चितळाला आपल्या स्वाधीन घेतले. नंतर त्याला देवरी येथील वनविभागात उपचार करून त्याला जवळील जंगलात सोडण्यात आले.

हेही वाचा -'द व्हाईट टायगर'सह या चित्रपटांचे ऑस्करसाठी नामांकन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.