गोंदिया - देवरी तालुका येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील तत्कालीन दोन प्रकल्पाधिकाऱ्यांनी 15 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भंडारा येथील सहायक प्रकल्प अधिकारी महानंदा श्रीरंग अंबादे (रा. वरठी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव राघोर्ते (रा. अमरावती) व जानुभाऊ पुराम (रा. नागपूर), असे अपहार केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील महादेव राघोर्ते यांनी सन 2004 ते 2005 ला कन्यादान योजनेसाठी मंजूर झालेल्या 3 लाख 9 हजार रुपयांचा अपहार केला. या योजनेत कोणतेही कागदत्र सादर न करता त्यांनी योजना राबविली. तसेच सन 2005 ते 2006 मध्ये आरोपी जानुभाऊ पुराम यांनी कन्यादान योजनेंतर्गत मंगळसूत्र व भांडे खरेदीमध्ये 9 लाख 60 हजार व गाई खरेदी योजनेंतर्गत 2 लाख 38 हजार 608 असा एकूण 15 लाख 7 हजार 608 रूपये याचा अपहार केला आहे.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही गोंदियात मुसळधार पाऊस, २४ तासात गारपीटीचे संकेत
या प्रकरणी दोन्ही सेवानिवृत्त प्रकल्प अधिकाऱ्यांवर शासनाची फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 409, 420 अन्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - धरणाच्या कालव्यात बसून शेतकऱ्यांचे उपोषण