ETV Bharat / state

ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा पर्यटनासाठी १ नोव्हेंबरपासून होणार पुन्हा सुरू - ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा पुन्हा सुरू

कोरोनामुळे हा धबधबा गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांची निराशा झाली होती. तर धबधब्यातील पर्यटनावर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, तो सुद्धा बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

हाजराफॉल धबधबा
हाजराफॉल धबधबा
author img

By

Published : Oct 28, 2020, 10:30 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य वनाने नटलेल्या भागात ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा वसलेला आहे. मात्र, कोरोनामुळे हा धबधबा गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांची निराशा झाली होती. तर धबधब्यातील पर्यटनावर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, तो सुद्धा बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे, शासनाने धबधबा पर्यटनासाठी सुरू करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वन व्यवस्थापन समितीने केली होती. या मागणीला यश आल्याने आता येत्या १ नोव्हेंबरपासून हाजराफॉल धबधबा पर्यटकांसाठी खुला होणार असल्याने पर्यटक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा

शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदर्श कार्यपध्दतीचे हाजराफॉल पर्यटनस्थळी काटेकोरपणे पालन करण्यात येईल. पर्यटकांना सुध्दा कोविड-19 करिता दिलेल्या अटी व नियमांच्या अधीन राहूनच पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाईल. 65 वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. हाजराफॉल येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल, असे न करणाऱ्या पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन

पर्यटन क्षेत्रात एकावेळी जास्तीत जास्त 200 पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांमध्ये सॅनिटायझर असणे बंधनकारक असणार आहे. पर्यटकांना शासनाने कोविड-19 बाबत दिलेल्या सूचना व आदर्श कार्यपध्दतीबाबत माहिती मिळणेकरीता प्रवेशद्वारावर व इतर महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावण्यात येतील. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. प्रवेशद्वारावर येणाऱ्या पर्यटकांचे थर्मल सेंसरद्वारे तापमान मोजण्यात येईल. कोविड-19 ची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांसाठी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व मास्क उपलब्ध असेल. तसेच उपहारगृहाकरीता शासनाने दिलेल्या निर्देशांचे हाजराफॉल कॅफे आणि खासगी उपहारगृहांमध्ये पालन करण्यात येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.