गोंदिया - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. असे असले तरी मुख्य लढत ही भाजपचे सुनील मेंढे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये झाली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये भाजपचे सुनील मेंढे आपली बाजु भक्कम करून वर्चस्व कायम ठेवत १ लाख ९७ हजार ८६७ मतांनी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धेंचा पराभव झाला आहे.
सकाळी ८ वाजल्यापासुन मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय १४ टेबलांवर मतमोजणीची कार्य पार पडले. एकूण ३३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात आली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी भाजपला साथ दिली आहे.
विधानसभा क्षेत्रात मिळालेली मते या प्रमाणे -
- १) तुमसर - सुनील मेंढे - १ लाख १० हजार ७७२, नाना पंचबुद्धे - ७४ हजार ११६
- २) भंडारा - सुनील मेंढे - १ लाख ३२ हजार ९, नाना पंचबुद्धे - ७७ हजार ४५६
- ३) साकोली - सुनील मेंढे - १ लाख १५ हजार २७२, नाना पंचबुद्धे - ८२ हजार ८३६
- ४) अर्जुनी-मोरगाव - सुनील मेंढे - ८६ हजार ८४२, नाना पंचबुद्धे - ७१ हजार ७४३
- ५) तिरोडा - सुनील मेंढे - ८९ हजार १४४, नाना पंचबुद्धे - ६८ हजार४३७
- ६) गोंदिया - सुनील मेंढे, १ लाख १२ हजार, नाना पंचबुद्धे - ७३ हजार ६९७