ETV Bharat / state

गोंदियात कृषी कायद्याचे भाजपकडून समर्थन, स्थगिती पत्राची केली होळी

author img

By

Published : Oct 7, 2020, 5:15 PM IST

महाराष्ट्रात शेतकरी कायदा लागू नाही व्हायला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकरी कायदा स्थगित करावा या करता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे आज भाजपच्या वतीने स्थगिती हटवून शेतकरी कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

bjp agitation for supports agriculture law in gondia
गोंदियात कृषी कायद्याचे भाजपकडून समर्थन

गोंदिया - केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात देशभर विरोधकांकडून आंदोलन केले जात आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ कॉंग्रेसने दिल्लीत ट्रॅक्टर जाळले. तर दुसरीकडे या कायद्याची तातडीने अंमलबजावणीच्या मागणीला घेवून आज ७ ऑक्टोबरला भाजपने या कृषी विधयेकांच्या समर्थानात भाजपने स्थगिती पत्राची होळी केली. तसेच यावेळी ट्रॅक्टरची पुजा करून शेतकरी विरोधी नसून शेतकऱ्यांचा हिताचा कायदा असल्याची माहिती भाजपचे नेते करत आहेत.

गोंदियात कृषी कायद्याचे भाजपकडून समर्थन, स्थगिती पत्राची केली होळी

शेतकरी कायदा केंद्र सरकारने लागू केले असले, तरी ज्या राज्यात इतर पक्षाची सत्ता आहे, अशा राज्यात हा शेतकरी कायदा लागू न करता स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रात या कायद्याचा विरोध आघाडी सरकारने केला आहे. महाराष्ट्रात शेतकरी कायदा लागू नाही व्हायला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकरी कायदा स्थगित करावा या करता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे आज भाजपच्या वतीने स्थगिती हटवून शेतकरी कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावेळी भाजप किसान आघाडीच्यावतीने आज ७ ऑक्टोबरला स्तंभ चौक येथे विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारला निवेदन देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.