गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यातील बिर्री-सिंदीपार येथे एका दहा वर्षीय मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना ३ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा- दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'
सिंदीपर ग्राम गट पंचायत अंतर्गत येणाऱ्या बिर्री येथे गावात मंडई निमित्त नाटकाचे आयोजन होते. गावातील कार्यक्रमाचा फायदा आरोपींनी घेतला. दहा रुपयांची फुस लावून रात्री ८.३० च्या सुमारास गावातीलच तलावाच्या बाजूला नेऊन अज्ञात चार व्यक्तींनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेला तलावात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र, पीडित मुलगी जिवंत असल्याने ती तलावातून ओलीचिंब बाहेर निघाली. जेव्हा ती वाट शोधत गावात आली तेव्हा ती चिखलाने माखलेली असल्याचे लोकांना दिसून आले. मुलीला आरोग्य तपासणी करण्यासाठी गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात भर्ती करण्यात आले. या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणयात आला आहे.