ETV Bharat / state

सोशल मीडियावरुन ओळख काढत लग्न करुन लाखो रुपये घेऊन पसार झालेल्याच्या आवळल्या मुसक्या - Gondia district news

गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीने फेसबूकवर मैत्री करून आधी लैगिक शोषण केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करून तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेत पळ काढला. पीडितने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करताच गोंदिया पोलिसांनी आरोपी दिलीप यादव (वय 39 वर्षे) याला पुण्यातून अटक केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Aug 11, 2021, 4:25 PM IST

Updated : Aug 11, 2021, 5:35 PM IST

गोंदिया - गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीने फेसबूकवर मैत्री करून आधी लैगिक शोषण केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करून तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेत पळ काढला. पीडितने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करताच गोंदिया पोलिसांनी आरोपी दिलीप यादव (वय 39 वर्षे) याला पुण्यातून अटक केली आहे.

माहिती देताना सहायक पोलीस उपनिरीक्षक

आरोपी दिलीप लक्ष्मण यादव (रा. जवाहरगंज चिडिया मैदान रोड नंबर 44 रेल्वे स्टेशनजवळ खंडोबा मध्य प्रदेश), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात नोकरी करतो. त्याला समर्थ हाउसिंग सोसायटी एकता चौक वॉर्ड नंबर 12 गणपती मंदिरजवळ रूपीनगर तळवडे चिखली बुद्रुक पुणे येथून अटक करण्यात आली आहे. 39 वर्षीय दिलीप यादव या व्यक्तीने कोरोना काळात गोंदिया शहरात राहणाऱ्या एका विधवा महिलेशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर दिलीप यादवने त्या महिलेशी 27 जुलै, 2020 ते 1 जून, 2021 या काळात गोंदियातील विविध हॉटेल, लॉजला नेत तिच्याशी शारीरिक सबंध देखील प्रस्थपित केले.

पीडितेशी गोंदियाच्या गायत्री मंदिरात लग्नही केले, तर काही दिवस तिचा नवरा बनून गोंदियात राहिला व तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेऊन पुण्याला पळ काढला. दिलीप हा परत न आल्याने ही बाब पीडितेच्या लक्षात आली. त्यानंतर तिने गोंदिया शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तक्रारीवरुन दिलीप यादवच्या विरोधात गोंदिया शहर पोलिसांनी भा.दं.वि.चे कलम 376 (2), (एन), 417, 420, 493, 494 अन्वये (फसवणूक आणि लैगिक अत्याचाराचा) गुन्हा दाखल केला. गोंदिया पोलिसांनी आरोपी दिलीप यादव याला पुण्यातून अटक केली.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

Last Updated : Aug 11, 2021, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.