ETV Bharat / state

गोंदिया शहरातील A टू Z सेलच्या दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोरेलाल चौकातील A टू Z या महासेलच्या इमारतीला (A To Z Mahacell Building Fire) आग लागली. ही घटना आज (18 मार्च) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. ही आग सध्या आटोक्यात आली आहे.

fire
गोंदियातील दुकानाला आग
author img

By

Published : Mar 18, 2022, 10:11 PM IST

Updated : Mar 18, 2022, 10:44 PM IST

गोंदिया - शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोरेलाल चौकातील A टू Z या महासेलच्या इमारतीला (A To Z Mahacell Building Fire) आग लागली. ही घटना आज (18 मार्च) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. ही आग सध्या आटोक्यात आली आहे. १६ अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या (Gondia Fire Brigade) मदतीने ४ तासानंतर ही आग नियंत्रणात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोंदियातील दुकानाला आग

आग आटोक्यात -

शहरातील मुख्य बाजारपेठमधीत गोरेलाल चौक परिसरातील एका हाँटेललगत a टू z महासेल आहे. A टू Z महासेलची इमारत वर्दळीच्या ठिकाणी आहे. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या इमारतीतून धूर निघताना काही नागरिकांना दिसला. त्यांनी लगेच याची माहिती अग्निशमन दल आणि शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर गोंदिया अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. तसेच लगतच्या इमारतींना आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे तिरोडा नगर परिषद अग्निशमन आणि अदानी वीज प्रकल्पाच्या अग्निशमन दलाची मदत घेण्यासाठी संपर्क केला. मात्र, आज होळी असल्याने चालक नसल्याचे सांगण्यात आले.

महासेलचे लाखो रुपयांचे नुकसान -

सायंकाळी ८ वाजतापर्यंत १६ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने ४ तासात आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत A टू Z महासेलचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. घटनास्थळी पोलीस, माजी आमदार राजेंद्र जैन लक्ष देऊन मदतकार्य करत होते.

Last Updated : Mar 18, 2022, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.