ETV Bharat / state

अट्टल चोरटा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात, सहा मोबाईल अन् एक चाकू जप्त

रेल्वेमधील प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या गोंदिया रेल्वे पोलिसांनी आवळल्य आहेत. त्याच्याकडून सहा मोबाईल व एक धारदार चाकू जप्त करण्यात आले आहे.

c
c
author img

By

Published : Aug 26, 2021, 4:34 PM IST

गोंदिया - रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीतून पोलिसांना बघून पळ काढणार्‍या आरोपीस अटक करण्यात आली. तसेच त्याच्या जवळून 6 मोबाईल व 1 धारदार चाकू, असा 43 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्या अट्टल मोबाईल चोरास अटक न्यायालयात हजर केले. बुधवारी (25 ऑगस्ट) करण्यात आली.

चोरटा व जप्त मुद्देमालासह पोलीस पथक

याबाबत पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, प्रवासी शिशुपाल भरतलाल बर्वे (वय 23 वर्षे, रा. भांकरपूर, गली नं.1, ता. राजनांदगाव, जि. दुर्ग, राज्य छत्तीसगड) हे 24 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेसने रक्षा बंधनानिमित्त राजनांदगाव ते गोंदिया असा प्रवास करत होते. ते रेल्वेच्या समोरील जनरल बोगीत बसले होते. गाडी 12.30 वाजता गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर पोहोचली. गाडीतून उतरताना प्रवाशांच्या गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. त्यांच्या तक्रारीवरून गोंदिया रेल्वे पोलिसांनी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे करत होते. बुधवारी खबऱ्याच्या माहितीनुसार आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी एक संशयित व्यक्ती गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात दिसून आला. पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घातली होती. ये-जा करणार्‍या गाड्यांकडे ते लक्ष ठेवून होते. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गीतांजली एक्सप्रेस (02260) फलाट क्र. 3 वर थांबली. त्या गाडीत पोलीस गस्त घालताना एक व्यक्ती त्यांना बघून गाडीच्या समोरील डब्यात उडी मारून आऊटर रेल्वे ट्रॅक साईडला पळू लागला. त्यामुळे पोलीस पथकाने त्याला घेराव घालून पकडले. त्याला पळून जाण्याचे कारण व नाव-पत्ता विचारण्यात आले. त्याने हर्ष राजेश बंसोड (वय 22 वर्षे, रा. भांकरनगर, वॉर्ड-13, ता.जि.दुर्ग राज्य छत्तीसगड), असे सांगितले. तसेच गाडीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचेही त्याने सांगितले.

जप्त मुद्देमाल
जप्त मुद्देमाल

चोराकडून 6 मोबाईल व 1 धारदार चाकू जप्त

दरम्यान, पोलीस पथकाने त्याची अंगझडती घेतली. त्यात एक 12 हजार रूपयांचा मोबाईल, 5 हजार 500 रूपयांचा दूसरा मोबाईल, 8 हजार रूपयांचा तिसरा मोबाईल, 10 हजार रूपयांचा चौथा मोबाईल, 2 हजार 500 रूपयांचा पाचवा मोबाईल, 2 हजार रूपयांचा सहावा मोबाईल व एक धारदार चाकू, असा एकूण 43 हजार 200 रूपयांचा माल मिळून आला.

चोरावर विविध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल

पोलीस पथकाने त्याची कसून चौकशी केली असता रेल्वेमध्ये लहान-मोठ्या चोर्‍या करण्याची सवय असल्याचे त्याने सांगितले. विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याला शिक्षासुद्धा दिली आहे. गाडीत चोरी करण्याच्या उद्देशाने बसलो होतो व पोलिसांना बघून पळून जाण्याचे प्रयत्न केल्याचे आरोपीने कबूल केले.

हेही वाचा - नक्षलग्रस्त समर्थकाच्या शेतात आढळले ५२ जिवंत काडतुसे; देवरी तालुक्यातील परसोडी शिवारातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.