ETV Bharat / state

धक्कादायक..! शासकीय राजमुद्रेचे बनावटी नियुक्तीपत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखों रुपयाने फसविले - खोटे नियुक्तीपत्र

शासकीय राजमुद्रेचा बनावटी वापर करून जिल्ह्यातील ७८ बेरोजगार शिक्षित तरुणांना थेट तलाठीपदी तसेच इतर पदासाठीचे नियुक्तीपत्र देत लाखों रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर, शुभम नागपुरे नामक युवकाने उपजिल्हाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून हे नियुक्तीपत्र दिल्याचेही समोर आले आहे.

शासकीय राजमुद्रेचे बनावटी नियुक्ती पत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखों रुपयाने फसविले
शासकीय राजमुद्रेचे बनावटी नियुक्ती पत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखों रुपयाने फसविले
author img

By

Published : Jan 23, 2020, 10:02 PM IST

गोंदिया - शासकीय राजमुद्रेचा बनावटी वापर करून जिल्ह्यातील ७८ बेरोजगार शिक्षित तरुणांना थेट तलाठीपदी तसेच इतर पदासाठीचे नियुक्तीपत्र देत लाखो रूपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर, शुभम नागपुरे नामक युवकाने उपजिल्हाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून हे नियुक्तीपत्र दिल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात एका आरटीआय कार्यकर्त्याने समोर आणला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याच्या नावावर गोरखधंदा करणारे दलाल सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

शासकीय राजमुद्रेचे बनावटी नियुक्तीपत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखों रुपयाने फसविले

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २०१९ मध्ये तलाठीपद भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात अनेक बेरोजगार युवकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले होते. या पदांची भरती प्रक्रिया पार पडली, पदेही भरण्यात आली आहेत. असे असताना नागरा येथील शुभम नागपुरे याने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पाहणी करून ज्या उमेदवारांची निवड झाली नाही अशा जवळपास ७८ उमेदवारांची यादी तयार केली. तसेच, आपण जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून सदर पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येकाकडून लाखो रुपये उकळले.

यानंतर युवकांनी नोकरीचे काय झाले, असे विचारले असता शुभम त्यांना कारणे सांगून वेळकाढूपणा करत होता. मात्र, त्यानंतर शुभमने रविशंकर अभिमन्यू मस्करे या युवकाला आपली तहसील कार्यालयात क्लर्क पदावर निवड झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्रही दिले. तसेच रविशंकर याला २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले. दरम्यान, २० डिसेंबर रोजी रविशंकर हा जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी हजर झाला. यावेळी, कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली असून आजची मुलाखत स्थगित करण्यात आल्याचे सांगून त्याला परत पाठविण्यात आले. दरम्यान, रविशंकर याला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. त्याने इतर फसवणूक झालेल्या युवकांना घेऊन आरटीओ कार्यकर्ता सुरेश दुरुगकर यांच्या मदतीने माहिती घेतली. यावेळी, हे नियुक्तीपत्र खोटे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचा - गोंदियात श्वानांचे लसीकरण शिबीर, जिल्ह्यातला पहिला प्रयोग

या पत्रावरील निवासी उपजिल्हाधिकारी यांची खोटी स्वाक्षरी, जावक क्रमांक व राजमुद्रा खोटी आढळून आली. यावर फसवणूक झालेले युवक रविशंकर मस्करे, मोहित राजेंद्र बोरकर, देवेंद्र शोभेलाल दमाहे, दिपेश इसुलाल दमाहे, संदेश लिहनदास बोरकर, मोहन मुकेश भोयर, विलास रूपलाल शेंदरे, शीतल गजेंद्र चिखलोंढे, ईश्वर सुरेश नेवारे या युवकांनी २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रकरणाची माहिती दिली. या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप अतुलकर यांनी फसवणूक झालेल्या युवकांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी शुभम नागपुरे याला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - आंतरराज्यीय पाकिटमाराला केली अटक; गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 23-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_23.jan.20_420_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
धक्कादायक..! शासकिय राजमुद्रेचा बनावटी नियुक्ती पत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखो रुपयाने फसविले
तलाठी पदाचे खोेटे नियुक्ती पत्र देत केली फसवणूक
उपजिल्हाधिकारीची मारली खोटी स्वाशरी
बनावट राजमुद्राही केली तयार
सावधाऩ़़! जिल्हाधिकारी कार्यालयात दलाल सक्रिय
पोलिसांत जिल्हाधिकाºयांनी केली तक्रार आरोपी फरार
Anchor :- शासकिय राजमुद्रेचा बनावटी वापर करून चक्क गोंदिया जिल्ह्यातील ७८ बेरोजगार शिक्षित तरूणांना थेट तलाठीपदी तसेच इतर पदासाठी नियुक्ती झाल्याचे नियुक्तीपत्र देत लाखो रूपये उखळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ऐवढेच नाही तर शुभम नागपुरे हा महाठग या वरच न थांबलाय नाही तर, त्याने उपजिल्हाधिकाऱ्याची खोटी शाक्षरी करून हे नियुक्तपत्र दिल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात एका आरटीआय कार्यकर्त्यांने समोर आणला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याच्या नावावर गोरखधंदा करणारे दलाल सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे.
VO :- गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २०१९ मध्ये तलाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, यात अनेक बेरोजगार युवकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले होते़ तर सदर पदाची भरती प्रक्रिया पार पडली, पद ही भरण्यात आली आहेत़ असे असताना नागरा येथील राहणाऱ्या शुभम नागपूरे नामक युवकाने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पाहणी करून ज्या उमेदवारांची निवड झाली नाही अशा जवळपास ७८ उमेदवारांची यादी तयार करून त्यांना आपण जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून सदर पदावर नोकरी लावून देण्याचे सांगून प्रत्येकाकडून लाखो रूपये घेऊन नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले़ यानंतर युवकांनी नोकरीचे काय झाले असे विचारले असता त्यांना टाळाटाळ करून कारण सांगून वेळ काढूपणा करत होता. मात्र त्यानंतर या ठक बाजाने रविशंकर अभिमन्यू मस्करे या युवकाला आपली तहसील कार्यालयात क्लर्क पदावर निवड झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्रही सदर व्यक्तीकडून देण्यात आले असून रविशंकर याला २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले़ दरम्यान, २० डिसेंबर रोजी रविशंकर हा जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी हजर झाला असता कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली असून आजची मुलाखत स्थगित करण्यात आली असल्याचे सांगून परत पाठविण्यात आले़ दरम्यान, रविशंकर याला आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्याने इतर फसवणूक झालेल्या युवकांना घेऊन आऱटी़ई़ कार्यकर्ता सुरेश दुरुगकर यांच्या मदतीने माहिती घेतली असता सदर पत्र खोटे असल्याचे समोर आले असता अशी धक्का दायक माहिती समोर आली.
PTC :- ओमप्रकाश सपाटे (ईटीव्ही भारत, गोंदिया)
BYTE :- आर.एस. पटले (सहाय्यक अधीक्षक व चौकशी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय)
BYTE:- रमेश दुरूगकर (आरटीई कार्यकर्ता)
VO :- या पत्रावरील निवासी उपजिल्हाधिकारी यांची खोटी स्वाक्षरी व जावक क्ऱ खोटे व राजमुद्रा खोटी आढळून आले आहे़ तर पत्रावर काही ठिकाणी संपादित करण्यात आले असल्याचे आढळून आले़ यावर फसवणूक झालेले युवक रविशंकर मस्करे, मोहित राजेंद्र बोरकर, देवेंद्र शोभेलाल दमाहे, दिपेश इसुलाल दमाहे, संदेश लिहनदास बोरकर, मोहन मुकेश भोयर, विलास रूपलाल शेंदरे, शीतल गजेंद्र चिखलोंढे, ईश्वर सुरेश नेवारे या युवकांनी २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून सदर प्रकरणाची माहिती दिली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली़ दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी या घटनेची दखल घेत या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ तर या प्रकरणाला गांभीर्याने घेत ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप अतुलकर यांनी फसवणूक झालेल्या युवकांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून शुभम नागपूरे याला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती आहेBody:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.