गोंदिया : गोंदिया शहरातील गणेशनगर येथे ९ मार्च रोजी एका कुरिअर बाॅय म्हणून आलेल्या व्यक्तीने घरी असलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र, हल्याच्या वेळी त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीने प्रसंगावधान साधल्याने हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला होता. शहरातील आशिष शर्मा हे आपल्या मोबाईल दुकानात असताना अज्ञात व्यक्ती कुरियर बाॅय म्हणून त्यांच्या घरी आला. त्यांच्या पत्नी सोनल शर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत संपूर्ण शहरात आरोपीचा शोध घेणे सुरु केले. मात्र, आठ दिवसांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, यामध्ये महिला वकील मोषमी मुखर्जी ( वय ४० वर्ष, रा. सिव्हिल ) व सुरज केशव रावते ( वय ५० वर्ष, रा. टी बी टोली ) असे आरोपींचे नाव ( Giondia Attempt To Murder Case Revealed ) आहे.
अशी घडली घटना
गोंदिया शहरातील गणेशनगर येथे राहणारे शर्मा यांच्याकडे एक कुरियर बॉय आला. त्याने शर्मा यांची पत्नी सोनल शर्मा यांनी दरवाजा उघडताच आरोपी आत शिरला व धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केला होता. त्यावेळेस घराच्यावरील मजल्यावर असलेली त्यांची मुलगी श्रेया ( वय 11 वर्षे ) खाली आली. तिने दृश्य पाहून आरोपीच्या पाठीवरील बॅग शक्तीनिशी खेचत आरडाओरडा करू लागली. त्यावेळी आरोपीने तिथून पळ काढला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, आरोपीने संपूर्ण चेहरा झाकून व घटनेत वापरलेल्या दुचाकीचा वाहन क्रमांक काळ्या पट्टीने बांधलेली असल्याचे आढळले.
अन् आरोपी अटकेत
याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यातील पुराव्यानुसार आरोपीचा शोध घेतला असता कुरियार बॉय हा कुरियर बॉय नसून, तो सुपारी किल्लर असल्याचे स्पष्ट झाले. त्याला महिला वकील मोसमी मुखर्जी हिने हत्या करण्याची सुपारी दिली होती. आरोपीने कुरियर बॉयच्या वेशभूषेत आशिष शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी सोनल शर्मावर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ११ वर्षीय मुलीने धाडस दाखवले. पोलिसांनी आरोपीला ८ दिवसानंतर १८ मार्चला त्याच्या राहत्या घरी टीबी टोली येथून अटक करण्यात आले. आपल्याला शर्मा यांच्या पत्नीला जीवे मारण्याची सुपारी मोषमी मुखर्जी यांनी दिल्याची कबुली दिली आहे. तर आरोपी मोसमी मुखर्जी व सुरज केशव रावते या दोघांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असून, २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.