ETV Bharat / state

तलावात गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - BOY DIED IN LAKE

तलावात अंघोळ करतो, असे आजोबांना सांगत रोहित तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रोहित पाण्यात बुडायला लागला. हे लक्षात येताच आजोबांनी आरडा ओरड केली. मात्र, तोपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता..

GONDIYA NEW
पाण्यात बुडून मृत्यु
author img

By

Published : Oct 30, 2020, 11:48 AM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात असणाऱ्या सौंदड गावातील मामा तलावात एका चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खडबळ उडाली आहे. रोहित पातोडे असे या बारा वर्षीय मुलाचे नाव आहे. रोहित गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहावीत शिकत होता.

तलावात बुडून मृत्यू..

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने रोहित आपल्या आजोबांसोबत मामा तलावाजवळ जनावरे चारण्यासाठी गेला होता. तलावात अंघोळ करतो, असे आजोबांना सांगत रोहित तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र, तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रोहित पाण्यात बुडायला लागला. हे लक्षात येताच आजोबांनी आरडा ओरड केली. मात्र, बचावासाठी कोणी येईपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेची माहिती मिळताच डुगीपार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रोहितचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.