गोंदिया :- पाच लाख रुपये किमतीची बिबट्याची कातडी विकण्यासाठी भंडाऱ्यातील तीन व्यक्ती गोंदिया जिल्ह्यात आल्या असल्याची गुप्त माहिती नवेगावबांध पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचत त्या तीनही व्यक्तींना अटक केली. त्यामध्ये देविदास दागो मरस्कोल्हे ५२ वर्ष, रा. झाडगाव, मंगेश केशव गायधने ४४ वर्ष, रा. पोहरा व रजनीस पुरुषोत्तम पोगडे ३२वर्ष, रा. सानगडी, या तीन आरोपीना अटक करण्यात आली व यांच्याकडून बिबट्याची कातडी, काळीज, गुडघा, दात, पंजे असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - विहंग सरनाईकबरोबर आ. प्रताप सरनाईक यांचीही आज चौकशी होण्याची शक्यता
या प्रकरणात नवेगाव -बांध वन विभागाने आणखी ५ आरोपीना अटक केली आहे. त्यामुळे बिबट कातडी विक्री प्रकरणात एकूण ८ आरोपी अटकेत आहे. यात ६ आरोपी हे भंडारा जिल्ह्यातील तर २ आरोपी गोंदिया जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी देवीदास दागों मरसकोल्हे यांने विद्युत प्रवाहाने बिबट्याची हत्या केली होती. त्याला साथ देणारे इतर ५ आरोपीच्या समावेश असल्याचे त्याने दिलेल्या कबुलीनुसार आरोपी गोवर्धन सुरेश, शिंदी मेश्राम ३० वर्ष, महेंद्र मोहनकर २७ वर्ष, वसंत खेडकर ५० वर्ष, महेश घरडे ३० याना अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात ८ आरोपी अटकेत आहे. या आरोपींनी बिबट्याची हत्या करत त्याचे अवयव व कातडी विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - तेव्हा कुठे गेली होती तुमची मर्दानगी?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल