गोंदिया - जिल्ह्यातील नदी नाले व लहान तळ्यातील पाणी खालावत चालली आहे. अशा नागरिकांनाही पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट होऊ लागला आहे. अशात पक्षांसाठी गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणी पक्षांसाठी 3 हजार मातीचे पाणवठे तयार करण्यात आल्या आहेत. या पाणवठ्यांमुळे पक्षांना मोठा आधार मिळत आहे. शिवाय या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. उपक्रमाला प्रोत्साहन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आणि वनविभागाच्या वतीने आवाहन केल्या जात आहे.
नियोजना अभावी जिल्ह्यातील जलाशय सपाट होऊ लागले आहे. त्यामुळे जलाशयाचा नैसर्गिक जलसाठा भर उन्हाळ्यात कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी माणसांबरोबरच पक्षांनाही भटकंती करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक संस्थाकडून विविध ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आले होते. मात्र आता तेही दिसून येत नाही. अशावेळी माणसांना पाण्याची सोय होत आहे, मात्र पक्षांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्या अभावी पक्षांचे मृत्यू होवू नये, यासाठी सायकल ग्रुपने पाणवठा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
'या' भागात लावण्यात आले पाणवठे : सामाजिक बांधिलकी जोपासत सायकल ग्रुपने शहरातील सुभाष उद्यान, विश्राम गृह, शासकीय कार्यालय, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी मोठे वृक्ष व निवासी वस्तीत ३ हजारहुन अधिक मातीचे पात्र उपलब्ध करू पाणवठे सुरु केले आहे. हा उपक्रम 10 एप्रिलपासून सुरु करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून आवाहन : शहरातील मोठे वृक्ष, सार्वजनिक ठिकाणे आणि आपल्या घराच्या परिसरात पक्षांसाठी पाणपाई सुरु करा. या उपक्रमामुळे पक्षी संवर्धनाबरोबरच पर्यावरण संरक्षणाला चालणा मिळेल. त्यामुळे प्रत्येकांनी स्वत:हुन अशा उपक्रमाला सुरुवात करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा - Remembrance of Jai Shri Rama : पावणेदोन कोटी वेळा लिहून केले 'श्रीरामा'चे नामस्मरण