ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा; शेकडो घरांमध्ये शिरले पाणी - गोंदिया पूर अपडेट

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठावरील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तिरोडा तालुक्यात गेले तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, तलाव व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, ढिवरटोली, बोंडराणी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा, करटी खु. या गावांमध्ये पाणी शिरले आहे

Gondia Flood
गोंदिया पूर
author img

By

Published : Aug 30, 2020, 1:18 PM IST

गोंदिया - संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोबतच मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक मार्ग बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरदेखील चार फूट पाणी साचले आहे. 1994 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहूतक पूर्णतः ठप्प झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठावरील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तिरोडा तालुक्यात गेले तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, तलाव व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, ढिवरटोली, बोंडराणी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा, करटी खु. या गावांमध्ये पाणी शिरले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. किंडगीपार व ढिवरटोली येथील 96 लोकांना आपत्ती निवारण पथकाने पाण्यातून बाहेर काढले आहे.

आमदार विजय रहागंडाले यांनी पुरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मदन पटले, स्वानंद पारधी आदी सहकारी होते. २००६ नंतर जिल्ह्यात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली असून यापेक्षाही जास्त पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांदोरी खुर्द ते बाघोली, चांदोरी खुर्द ते कन्हारटोली, करटी खु.व टोलीचा, पिपरिया व ढिवरटोली, गोंडमोहाडी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा गावाचा संपर्क तुटला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वैनगंगा आणि बाघ नदीच्या काठावरील गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात बचाव पथकाच्या 26 जणांची तीन पथके पाठवण्यात आली आहे. आणिबाणीच्या प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी एक पथक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात राखीव ठेवण्यात आली आहे. तिरोडाचे नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी किडंगीपार येथे गेल्याची माहिती तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.