ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भामरागडमधील आठवडी बाजार रद्द - Gadchiroli Corona Latest News

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दर बुधवारी भरत असलेला भामरगड येथील आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भामरागडमधील आठवडी बाजार रद्द

author img

By

Published : Mar 17, 2021, 9:31 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दर बुधवारी भरत असलेला भामरगड येथील आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे, जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज भामरागडचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. तसेच व्यापाऱ्यांना आज बाजारात न येण्याच्या सूचना भामरागड नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाने नागरिकांना देखील कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.