ETV Bharat / state

काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार

author img

By

Published : Apr 16, 2020, 8:16 PM IST

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या एकत्रीकरणातून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. त्यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, तर गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

गडचिरोली - कोरोना संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी निर्गमित केला. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या एकत्रीकरणातून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. त्यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, तर गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिंदे यांच्याकडे गडचिरोलीसोबतच ठाणे जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिंदे पालकमंत्री झाल्यापासून फक्त एक वेळ गडचिरोलीत आले. त्यामुळे पालकमंत्री कुठे आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

हेही वाचा - औरंगाबादेत कोरोनाचे दोन नवे रुग्ण, बाधितांची संख्या 27 वर

आता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या पालकमंत्री नियुक्तीबाबतच्या शासन निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे. त्यानुसार भंडारा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वडेट्टीवार हे गडचिरोलीचे पालकमंत्री व्हावे, ही त्यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची इच्छा होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.