ETV Bharat / state

ब्रेक दी चैन अंतर्गत जिल्ह्यात १५ मे पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी लागू - गडचिरोली जिल्ह्यात १५ मे पर्यंत जमावबंदी

ब्रेक दी चैन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५ मे पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश लागू केले आहेत.

Curfew in Gadchiroli district till May 15
गडचिरोली जिल्ह्यात १५ मे पर्यंत जमावबंदी
author img

By

Published : Apr 30, 2021, 10:53 PM IST

गडचिरोली : ब्रेक दी चैन अंतर्गत जिल्ह्यात १५ मे पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश लागू केले आहेत.

मिशीन बिगीन अगेन अंतर्गत नियमावली व उपाययोजना जिल्ह्यात लागू आहेत. त्याअनुषंगाने शासन आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी शासन निर्देशाप्रमाणे ब्रेक द चैन अंतर्गत जिल्ह्यात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी १ मे २०२१ चे सकाळी ७ वाजल्यापासून दिनांक १५ मे २०२१ चे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू केले आहे.

यापुर्वीचे शासन आदेशातील अटी, शर्ती दंडाबाबत निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय- निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.