ETV Bharat / state

गडचिरोलीत ट्रुनॅट कोव्हीड १९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन - गडचिरोली लेटेस्ट न्युज

ट्युबरकुलॉसिस (टीबी) च्या चाचणीत वापरल्या जाणाऱ्या या निदान यंत्रांचा वापर कोव्हीड-१९ तपासणी करण्यासाठी आयसीएमआरकडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातही या प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यात आली. त्यानुसार ही प्रयोगशाळा उभारण्यात आली.

truenat covid 19 laboratory gadchiroli  gadchiroli latest news  gadchiroli corona update  gadchiroli corona laboratory  ट्रूनॅट प्रयोगशाळा गडचिरोली  गडचिरोली लेटेस्ट न्युज  गडचिरोली कोरोना अपडेट
गडचिरोलीत ट्रुनॅट (TrueNat) कोव्हीड १९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन
author img

By

Published : Jun 4, 2020, 5:12 PM IST

गडचिरोली - जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रून (True Nat) कोव्हीड १९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या प्रयोगशाळेत रुग्णाची प्राथमिक चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर रुग्णाला खरंच कोरोनाची बाधा झाली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नागपूर येथेच नमुने पाठविण्यात येणार आहेत.

गडचिरोलीत ट्रुनॅट (TrueNat) कोव्हीड १९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन

ट्युबरकुलॉसिस (टीबी) च्या चाचणीत वापरल्या जाणाऱ्या या निदान यंत्रांचा वापर कोव्हीड-१९ तपासणी करण्यासाठी आयसीएमआरकडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातही या प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यात आली. त्यानुसार ही प्रयोगशाळा उभारण्यात आली. या ट्रुनॅट प्रयोगशाळेमुळे कोरोना संसर्ग झाला नसल्याचे आता ५० मिनीटांमध्ये खात्रीने सांगता येईल. जिल्ह्यातील जास्त जोखमीच्या रुग्णांचे अहवाल तत्काळ स्वरुपात तपासता येतील, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.