गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा रामपूर फाट्यावर ट्रकने दुचाकीला दुपारी तीनच्या सुमारास धडक दिली. या अपघातात एका चार वर्षाच्या मुलीसह चार जण जखमी झाले होते. सर्व जखमींना आरोमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असाता उपचारादरम्यान 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी तिघांना गडचिरोली येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जोगी साखरा येथील लग्न समारंभ आपटुन चंद्रपुर जिल्ह्यातील मांगली येथील कालीदास मेश्राम (वय ५५ ) कालीद्रा कालीदास मेत्राम (वय ५०) चंद्रभागा महादेव मेत्राम (चिचगाव, वय ६५) चैताली पुण्यवान संहारे (वय ४) दुचाकीने जोगी साखरा गावावरुन आरमोरी कडे जात होते. यावेळी रामपुर फाट्यावर आरमोरी वरुण जोगी साखराकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भिषण अपघात झाला.
अपघातात एका लहान मुलीसह दोन पुरुष आणि दोन महीला जखमी झाल्याची माहीती जोगी साखरा ग्रामपंचायचे उपसरपंच संदिप ठाकुर, दिलीप घोडाम, राजकुमार भोयर यांना मीळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली, आणि जखमिंना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जखमिंच्या नातेवाईकांना संदीप ठाकुर, दिलीप घोडाम, डॉ संजय ठेगरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून फोन करून बोलाऊन घेतले आणि जखमींच्या उपचासाठी आर्थिक मदत केली. अधिक तपास आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी करत आहेत.