गडचिरोली - जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांमध्ये तेंदू संकलनाचे काम सुरु झाल्याने मजुरांमध्ये आनंद दिसून येत आहे. यावर्षी तेंदूपत्ता उत्तम दर्जाचे आहेत. त्यामुळे मजुरांनीही चांगला दर मिळतो आहे. शिवाय तेंदूपत्ता संकलन करताना मोठा उत्साह मजुरांमध्ये पाहायला मिळत आहे. आठ दिवस चालणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायातून जिल्ह्यात जवळपास ३०० काेटी रुपयांची उलाढाल हाेते. ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिल्याने वन विभागाचे महत्त्व कमी झाले आहे.
अर्थचक्राला संजीवनी : वन संपदाने श्रीमंत म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात तेंदूपत्याची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तेंदूपत्याचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे येथिल मालाला राष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. कंत्राटदारालाही चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे मजूर कंत्राटदार सध्या समाधानी आहेत. याठिकाणी बांबू व तेंदु हंगामा कमी दिवसात अधिक नफा देणारी हंगामा आहे. या हंगामाच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत प्राप्त होतो. या कामातून मिळालेल्या पैशावरच आदिवासींचे वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. त्यामुळे आदिवासी ग्रामीण भागातील अर्थ चक्राला संजीवनी देणारा हा तेंदु पत्ता हंगाम म्हणून ओळखला जातो. लहान बाळापासून तर वयोवृद्ध माताऱ्यांना याची आस असते. दक्षिण गडचिरोली तालुक्यातील सर्वच गवांमध्ये नागरिक तेंदू संकलनाचे कामात गुंतले आहेत.
हेही वाचा - महागाईच्या काळात माणूसकीचे दर्शन.. पुण्यातील तरुण पोलीस, अपंगांना देतोय मोफत रिक्षा सेवा