ETV Bharat / state

नक्षलवाद्यांच्या दहशतीत आजही भरते सुरजागडची यात्रा - सुरजागडची यात्रा

एटापल्ली तालुक्यातील घनदाट जंगलात सुरजागड डोंगर असून या भागात असलेल्या ठाकूरदेव येथे आदिवासींचे श्रध्दास्थान असलेले ऐतिहासिक मंदिर आहे. गेल्या शंभर वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी भरते. या यात्रेत गडचिरोली जिल्हयासह बस्तरमधून मोठया प्रमाणात आदिवासी नागरिक येत असतात.

gadchiroli
नक्षलवाद्यांच्या दहशतीत आजही भरते सुरजागडची यात्रा
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:59 AM IST

गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील सुरजागड जंगलातील डोंगरावर शेकडो वर्षांपासून सुरू असलेली आदिवासींची परंपरागत ठाकूरदेव यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडली. माओवाद्यांच्या हालचालीचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या या भागात दक्षिण गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या बस्तर जिल्ह्यातून हजारो आदिवासी भाविक चार दिवस होणाऱ्या यात्रेत सहभागी झाले होते.

नक्षलवाद्यांच्या दहशतीत आजही भरते सुरजागडची यात्रा

हेही वाचा - 'भारत बंद'ला गडचिरोलीत संमिश्र प्रतिसाद; सहा हजार कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

एटापल्ली तालुक्यातील घनदाट जंगलात सुरजागड डोंगर असून या भागात असलेल्या ठाकूरदेव येथे आदिवासींची श्रध्दास्थान असलेले ऐतिहासिक मंदिर आहे. गेल्या शंभर वर्षांपासून ही यात्रा या ठिकाणी भरते. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यासह बस्तरमधून मोठया प्रमाणात आदिवासी येत असतात. यावर्षीही या यात्रेत मोठया प्रमाणात हजारो आदिवासी बांधव जमले होते. पहिल्या दिवशी घटस्थापनेने या यात्रेची सुरुवात होत असली तरी ठाकूरदेवच्या मंदिरातील मुख्य पूजा ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते.

हेही वाचा - निरोगी आरोग्यासाठी धावले ४० आदिवासी युवक

तब्बल दहा किलोमीटर लांब असलेल्या सुरजागड डोंगरावर शेकडो आदिवासी नागरिक जंगलातून पायी जातात. यात्रेत देवाला बोकडाचा बळी देऊन पूजा करतात. या यात्रेत मोठया प्रमाणात लागणारी विविध साहित्याची दुकाने या दुर्गम भागासाठी आकर्षणाचा विषय ठरतो. या भागातल्या आदिवासींना खरेदीसाठी एक बाजारपेठ उपलब्ध होते. तसेच यात्रेत तीन दिवस सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळते. सलग तीन दिवस आदिवासी संस्कृतीसाठी लोकप्रिय असलेल्या 'रेला' नृत्याचे या यात्रेत आकर्षण असते. यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही यात सहभागी होतात. हा भाग नक्षलवादी हालचालींसाठी अतिसंवेदनशील असला तरी श्रध्देने या यात्रेत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा - गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे जंगी स्वागत

गडचिरोली जिल्ह्यात भविष्यातल्या सगळया उत्खननाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी भूमिका मांडत जल, जंगल, जमिनीवरचा अधिकार कुठल्याही परिस्थितीत आदिवासी सोडणार नाहीत. सुरजागड डोंगरावरील उत्खननाला विरोध दर्शवत या यात्रेचा समारोप करण्यात आला.

Intro:नक्षलवाद्यांच्या दहशतीत घनदाट जंगलात भरणाऱ्या सुरजागड यात्रेत हजारो भाविकांची गर्दी

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड जंगलातील पहाडीवर शेकडो वर्षापासुन सुरू असलेली आदीवासींची परंपरागत ठाकुरदेव याञा हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडली. माओवाद्यांच्या हालचालीचा केंद्रबिंदु समजल्या जाणाऱ्या या भागात दक्षिण गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या बस्तर जिल्ह्यातून हजारो आदीवासी भाविक या चार दिवसीय याञेत सहभागी झाले होते. Body:एटापल्ली तालुक्यातील घनदाट जंगलात सुरजागड पहाड असुन या भागात असलेल्या ठाकुरदेव येथे आदीवासींची श्रध्दा असलेले ऐतिहासिक मंदीर आहे. गेल्या शंभर वर्षापासुन ही यात्रा भरते. या याञेत गडचिरोली जिल्हयासह बस्तरमधून मोठया प्रमाणात आदीवासी नागरिक एकञ जमतात. यावर्षीही या याञेत मोठया प्रमाणात हजारो आदीवासी बांधव जमले होते. पहील्या दिवशी घटस्थापनेने या याञेची सुरुवात होत असली तरी सगळयात महत्वाची पुजा ठाकुरदेवच्या मंदीरातली मुख्य पुजा असते. तब्बल दहा किलोमीटर लांब असलेल्या सुरजागड पहाडावर शेकडो आदीवासी नागरीक जंगलातून पायी जातात आणि बोकडाचा बळी देऊन पुजा करतात.

या याञेत मोठया प्रमाणात लागणारी विविध साहित्याची दुकाने या दुर्गम भागासाठी आकर्षणाचा विषय ठरतो. या भागातल्या आदीवासींना खरेदीसाठी एक बाजारपेठ उपलब्ध होते. तसेच याञेत तीन दिवस सांस्कृतीक मेजवानी पहायला मिळते. सलग तीन दिवस आदीवासीं संस्कृतीसाठी लोकप्रिय असलेला रेला नृत्य या भागात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यात तरुणाईसह वरिष्ठ नागरीकही भाग घेतात.  नक्षलवादी हालचालींसाठी अतिसंवेदनशील भाग असला तरी श्रध्देने या याञेत येणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी आहे.

गडचिरोली जिल्हयात भविष्यातल्या सगळया उत्खननाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी भुमिका मांडत जल, जंगल, जमिनीवरचा अधिकार कुठल्याही परिस्थितीत आदीवासी सोडणार नाही. सुरजागड पहाडावरील उत्खननाला विरोध दर्शवत याञेचा समारोप झाला .Conclusion:सोबत रेडी टू युज pkg
बाईट 1 : भाविक
बाईट 2 : भाविक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.