ETV Bharat / state

महेश राऊतला गडचिरोलीच्या न्यायालयात केले हजर; सुरेंद्र गडलिंगच्या जामिनावर २६ जुलैला सुनावणी - दिवाणी

नक्षल्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या महेश राऊतला आज गडचिरोलीतील आरमोरीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. तर कोरेगाव-भीमा दंगल व नक्षल्यांशी सबंध असल्यावरून अटकेत असलेला सुरेंद्र गडलिंग याच्या जामीन अर्जावर गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी आता २६ जुलैला होणार आहे.

महेश राऊत आणि सुरेंद्र गडलिंग
author img

By

Published : Jul 20, 2019, 7:45 PM IST

गडचिरोली - नक्षल्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या महेश राऊतला आज गडचिरोलीतील आरमोरीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. तर कोरेगाव-भीमा दंगल व नक्षल्यांशी सबंध असल्यावरून अटकेत असलेला सुरेंद्र गडलिंग याच्या जामीन अर्जावर गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी आता २६ जुलैला होणार आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आरमोरी येथे रॅली काढण्यात आली होती. मात्र, या रॅलीला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे आरमोरी पोलिसांनी महेश राऊतसह डॉ. महेश कोपुलवार, रमेशचंद्र दहिवडे, हिरालाल येरमे, अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, चंद्रकांत मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, हरिपाल खोब्रागडे, अमोल दामले, मीनाक्षी सेलोकर, मंजुषा बेंद्रे, सिंधुताई कापकर, देवराव चवळे या १४ जणांवर गुन्हे दाखल केले होते.

याप्रकरणी आज शनिवारी आरमोरी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात साक्ष तपासणी होती. यासाठी पुणे पोलिसांच्या अटकेमुळे येरवडा कारागृहात असलेल्या महेश राऊतला गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेऊन आरमोरीच्या न्यायालयात दुपारच्या सुमारास हजर केले. साक्ष तपासणी झाल्यानंतर पोलीस संरक्षणात त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. यात साक्ष तपासणीसाठी आलेल्या १४ जणांपैकी अमोल मारकवार हरिपाल खोब्रागडे व देवराव चवळे हे ३ जण वगळता सर्वजण उपस्थित होते.

दरम्यान, कोरेगाव-भीमा दंगल व नक्षल्यांच्या संबंध असल्याच्या कारणावरून अटकेत असलेला सुरेंद्र गडलिंग याला जामीन मिळावा, यासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात मे महिन्यात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तर आता २६ जुलै रोजी जामीन अर्जावर ही सुनावणी होणार आहे.

Intro:पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या महेश राऊतची गडचिरोलीच्या न्यायालयात पेशी ; सुरेंद्र गडलिंगच्या जामिन अर्जावर 26 जुलैला सुनावणी

गडचिरोली : नक्षल्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांच्या अटकेत असलेला महेश राऊतला आज 20 जुलैला गडचिरोलीतील आरमोरीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. तर कोरेगाव-भीमा दंगल व नक्षल्यांशी सबंध असल्यावरून अटकेत असलेला सुरेंद्र गडलिंग याच्या जामीन अर्जावर गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र काही कारणास्तव ही सुनावणी आता 26 जुलैला होणार आहे.Body:कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आरमोरी येथे रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅलीला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही ही रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे आरमोरी पोलिसांनी महेश राऊतसह डॉ. महेश कोपुलवार, रमेशचंद्र दहिवडे, हिरालाल येरमे, अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, चंद्रकांत मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, हरिपाल खोब्रागडे, अमोल दामले, मीनाक्षी सेलोकर, मंजुषा बेंद्रे, सिंधुताई कापकर, देवराव चवळे या १४ जणांवर गुन्हे दाखल केले होते.

या प्रकरणी आज शनिवारी आरमोरी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात साक्ष तपासणी होती. यासाठी पुणे पोलिसांच्या अटकेमुळे येरवडा कारागृहात असलेला महेश राऊतला गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेऊन आरमोरीच्या न्यायालयात दुपारच्या सुमारास हजर केले. साक्ष तपासणी झाल्यानंतर पोलीस संरक्षणात त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. यास साक्ष तपासणीसाठी 14 जणांपैकी अमोल मारकवार हरिपाल खोब्रागडे व देवराव चवळे हे तीन जण वगळता सर्व जण उपस्थित होते.

दरम्यान कोरेगाव-भीमा दंगल व नक्षल्यांच्या संबंध असल्याच्या कारणावरून अटकेत असलेला सुरेंद्र गडलिंग याला जामीन मिळावा, यासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात मे महिन्यात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज शनिवारी सुनावणी होणार होती. मात्र काही कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता 26 जुलै रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.Conclusion:सोबत महेश राऊत व सुरेंद्र गडलिंग यांचे पासपोर्ट आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.