ETV Bharat / state

अस्थायी फवारणी कामगारांचे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण - नियमबाह्य

गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी फवारणी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. उपोषण मंडपाला एकाही अधिकार्‍याने भेट न दिल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
author img

By

Published : Jun 30, 2019, 11:24 PM IST

गडचिरोली - अस्थायी फवारणी कामगारांना सेवेत कायमचे सामावून घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी फवारणी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. उपोषण मंडपाला एकाही अधिकार्‍याने भेट न दिल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

अस्थायी फवारणी कामगारांचे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सन 1972 पासुन अस्थायी फवारणी कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात आरोग्य खात्यात हिवताप कार्यालयाच्या आस्थापनेवर हे कामगार कार्यरत आहे. त्यांना कायम सेवेत सामावून घेण्याकरीता सन 1982 पासून अनेक शासन नियम निघालेले आहेत. परंतु याची अद्यापही दखल घेतल्या गेली नाही. अधिकाऱयांनी आपल्या हिचिंतकांनाच कायम सेवेत सामावून घेतले, असा फवारणी कामगारांचा आरोप आहे.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 60 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांच्या जागेवर त्यांच्या एका पाल्यांना फवारणी कामावर घेतले जाते. परंतु गडचिरोली जिल्हयात 60 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांच्या पाल्यांना अस्थायी फवारणी कामगार म्हणूनही घेतलेले नाही. त्यामुळे कामगार संघटनेने 27 मे 2013 पासुन सहसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांच्याकडे विनंती केली होती. आणि ती त्यांनी मान्य केली.

परंतु गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकाऱयांनी त्यांच्या आदेशाचे पालन केले नाही. शिवाय आपल्या पदाचा दुरूपयोग करून जिल्ह्यातील फवारणी कामगारांच्या पाल्यांना कामावर न घेता दुसऱया जिल्ह्यातील लोकांना फवारणी कामावर नियमबाह्य पद्धतीने घेतले, असा आरोप कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमत शेख यांनी केला.

या आहेत मागण्या
१) सन १९७२ पासून काम करणारे फवारणी कामगारांना डावलून नवीन ८३९ झालेली पदभरती रद्द करणे
२) फवारणी कामगारांना ११ महिन्याचे काम मिळण्यात यावे
३) सहाव्या वेतन आयोगाचे थकीत रक्कम त्वरीत देण्यात यावी
४) आरोग्य सेवक पुरुष वर्ग ३ व ४ वर्ग यांचे सरळसेवेने समावेशन करण्यात यावे
५) प्रथम नियुक्तीचे दिनांक लक्षात घेवून सेवेत सामावून घेण्यात यावे
६) ज्यांचे ६० वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना पेंशन योजना लागू करण्यात यावी

Intro:अस्थायी फवारणी कामगारांचे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

गडचिरोली : सेवेत कायम सामावून घ्यावे, यासह इतर मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी फवारणी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आज शनिवारी उपोषणाचा तिसरा दिवस असताना उपोषण मंडपाला एकाही अधिकार्‍याने भेट न दिल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.Body:जिल्ह्यात आरोग्य खात्यात हिवताप कार्यालयाच्या आस्थापनेवर सन 1972 पासुन अस्थायी फवारणी कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायम सेवेत सामावून
घेण्याकरीता सन 1982 पासून अनेक शासन नियम निघालेले आहेत. परंतु अधिकारी वर्गानी या शासन नियमाचे पालन न करता त्यांच्या मनाला वाटेल
तसा अर्थ काढुन फक्त आपल्या हिचिंतकांनाच कायम सेवेत सामावून घेतले, असा फवारणी कामगारांचा आरोप आहे.

तसेच महाराष्ट्रातील सर्वच जिल्हात 60 वर्ष पूर्ण झालेल्या
कामगारांच्या ठिकाणी त्यांच्या एका पाल्यांना फवारणी कामावर घेतले. परंतु गडचिरोली जिल्हयात 60 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांच्या पाल्यांना अस्थायी फवारणी कामावर घेतलेले नाही. म्हणून कामगार संघटनेने
27 मे 2013 पासुन सहसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांच्याकडे विनंती केली होती आणि ती त्यांनी मान्य केली. परंतु जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांनी त्यांच्या आदेशाचेही पालन केलेले नाही व आपल्या पदाचा दुरूपयोग करून आदिवासी गडचिरोली जिल्हयातील फवारणी कामगारांच्या पाल्यांना कामावर न घेता आडमार्गाचा वापर करून दुस-या जिल्हातील लोकांना फवारणी कामावर घेतले, असाही आरोप यावेळी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमत शेख यांनी यावेळी केला.

या आहेत मागण्या
१) सन १९७२ पासून काम करणारे फवारणी कामगारांना डावलून नवीन ८३९ झालेली पदभरती रद्द करणे.
२) फवारणी कामगारांना ११ महिन्याचे काम मिळण्यात यावे.
३) सहाव्या वेतन आयोगाचे थकीत रक्कम त्वरीत मिळण्यात यावी.
४) आरोग्य सेवक पुरुष वर्ग ३ व ४ वर्ग यांना सरळसेवेने समावेशन करण्यात यावे.
५) प्रथम नियुक्तीचे दिनांक लक्षात घेवून सेवेत सामावून घेण्यात यावे.
६) ज्यांचे ६० वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना पेंशन योजना लागू करण्यात यावी.

Conclusion:सोबत व्हिज्युअल व बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.