ETV Bharat / state

हातावर पोट असणाऱ्या गरिबांना सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संचारबंदीसाारखा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोजंदारीने काम करणारे मजूर, विधवा व अपंग अशा अनेक नागरिकांसमोर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी स्वच्छेने मदतीसाठी जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनांनी, संस्थांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन अन्नाचे वाटप केले.

gadchiroli
गरिबांना सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात
author img

By

Published : Apr 12, 2020, 4:45 PM IST

गडचिरोली - संपूर्ण देशात कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूच्या प्रादुर्भावाने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संचारबंदीसाारखा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोजंदारीने काम करणारे मजूर, विधवा व अपंग अशा अनेक नागरिकांसमोर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी स्वच्छेने मदतीसाठी जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनांनी, संस्थांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन अन्नाचे वाटप केले.

गरिबांना सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात

गडचिरोली जिल्ह्यातील खनकोपाऱ्यात लाकडाऊनमुळे अनेक समस्या उद्भवल्या आहे. हाताला काम नसल्याने अनेकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दळण वळणाचा अभाव असल्याने पावसाळ्यात तेल तिकट मिळत नाही. बारमही नैसर्गिक आपत्तीला अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील नागरिक तोंड देत आहेत. या भागात मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे येत आहेत.

गरिबांना सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात

भामरागड येथील प्रभारी तहसीलदार सत्यनारायण सीलमवार,उप विभागिय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोणवाने, व ठाणेदार संदीप भांड यांनी स्वदीच्छेने गोरगरीब मजुरांना लाकडाऊनमुळे उपासमारीचे पाळी येऊ नये याचा विचार करुन स्वशक्तीने मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भामरागड येथील त्रीवेणी व्यापारी संघटना व स्थानिक पत्रकार संघटनेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

गरिबांना सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात

या संघटनेतर्फे घरोघरी जाऊन तांदुळ दिले जात आहेत. तसेच सर्व व्यापारी एकत्र आले आहेत. त्यांनीही शक्य तेवढे मदत करण्याचे ठरवले आहे. कोणी पैसे देत आहे तर कोणी तांदूळ, तेल, तिखट, मीठ, हळद, डाळ अशी जीवनावश्यक वस्तूंची मदत करत आहेत. यावेळी भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, तहसीलदार सत्यनारायण सीलमवार ठाणेदार संदीप भांड उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.