ETV Bharat / state

अखेर गडचिरोलीतील कार्यकाळ संपलेल्या 16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या - home minister Anil Deshmukh

Intro:अखेर कार्यकाळ संपलेल्या गडचिरोलीतील 16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यावर्षी कोरोना महामारीमुळे साधारणता मे महिन्यामध्ये होणाऱ्या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर चार ते पाच वेळा बदल्यांसाठी तारीख ठरली होती. अखेर त्यांच्या बलचीचे आदेश निघाले आहेत.

Gadchiroli police news
16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
author img

By

Published : Oct 30, 2020, 11:19 AM IST

गडचिरोली - पोलीस सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही गेल्या कित्येक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोलीत कार्यरत 16 पोलीस निरीक्षक व 12 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी धडकले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पोलीस निरीक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी आताही 100 हून अधिक पोलीस उपनिरीक्षकांना बदलीची प्रतीक्षा लागून आहे.

कोरोनामुळे लांबली 'चॉईस' बदली-

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी नव्या दमाचे पोलीस अधिकारी पाठवले जातात. येथील खडतर कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांना 'चॉईस' बदली दिली जाते. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे साधारणता मे महिन्यामध्ये होणाऱ्या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर चार ते पाच वेळा बदल्यांसाठी तारीख ठरली. बदल्यांसाठी वारंवार 'तारीख पे तारीख' दिली जात असल्याने कार्यकाळ पूर्ण होऊनही बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. 15 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या बदल्यांनाही 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अखेर काल बुधवारी 16 पोलीस निरीक्षक व 12 सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच काही पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले.

यामध्ये चामोर्शीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर, सुनील उईके यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली आहे. आष्टीचे ठाणेदार रजनीश निर्मल यांची पुणे शहर, भामरागडचे ठाणेदार संदीप भांड लाच प्रतिबंधक विभाग, सुरेश मदने ठाणे शहर, देसाईगंजचे ठाणेदार प्रदीप लांडे यांची जात पडताळणी विभाग नागपूर, प्रकाश तुंकलवार यांची यवतमाळ, गडचिरोलीचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांची अमरावती ग्रामीण, दीपरतन गायकवाड यांची सोलापूर ग्रामीण, सायबर क्राईमचे अजित राठोड यांची यवतमाळ, गोरख गायकवाड यांची सोलापूर ग्रामीण, सुरेश चिल्लावार सांगली, सतिष होडकर यांची कोल्हापूर, महेश इंगळे यांची सातारा, संजय मोगले यांची पुणे शहर, अमोल माळवे यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. तर संतोष खेडकर, रमेश पवार यांच्या बदलीला 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक चरणदास पेंदाम यांना मुदतवाढ-

सहाय्यक पोलीस निरीक्षक चरणदास पेंदाम यांना मुदतवाढ देण्यात आली असून संदीप मंडलिक यांची पिंपरी चिंचवड, नेताजी बंडगर यांची कोल्हापूर, रतन खैरनार यांची नवी मुंबई, रामेश्वर दराडे यांची ठाणे, गजानन पडळकर कोकण, सचिन जगताप कोल्हापूर, सुरेश साळुंखे कोकण, मिलिंद पाठक पुणे शहर, श्रीकांत शिंदे कोकण, मनोज कुमार नवसारे कोल्हापूर, विशाल जाधव पिंपरी चिंचवड, दत्तात्रय दराडे यांची कोल्हापूर येथे बदली तर अमोल फडतरे व अंजली राजपूत यांच्या बदलीला 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षकामध्ये सतीश जावळे यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.