गडचिरोली - दिवाळीच्या निमित्ताने सिरोंचा पोलीस जवानांनी तमदाला गावतातील ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यान त्यांनी गावकऱ्यांना फराळ, गोड पदार्थ, नवीन कपडे, फटाके वाटले.
हेही वाचा - पंढरपुरात विड्याच्या पानाला उच्चांकी दर, जुनवान पान बाजारास प्रारंभ-
एकीकडे बंदुक हातात घेऊन 24 तास नक्षलवाद्यांसोबत लढा देत दुर्गम भागात हे जवान तैनात रहतात. तर, कधी हातात कुदळ फावडे घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यात सहभाही होताना दिसतात. याच जवानांनी दिवाळी सणानिमित्ताने तमदाला येथील ग्रामस्थांसोबत राहुन दिवाळी साजरी करुन आपुलकी दाखविली.
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला दिवाळीचा सण म्हणजे संपन्नता समृध्दी आणि आनंदाचे प्रतीक. मात्र, जंगलातील डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी, गैर आदिवासी नागरिकांना दोन वेळा अन्नासाठी धडपड करावी लागते.
मात्र, पोलीसांनी पुढाकार घेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला. सिरोंचा येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांच्यासह जवानांनी गावकऱ्यांसाठी फराळ, गोड पदार्थ, नवीन कपडे, फटाके घेतले. गावकऱ्यांना फराळ, लाडु, चिवडा तसेच लहान मुलांना फटाके वाटप केले. चिमुकल्यांसोबत फटाके फोडून दिवाळी साजरी केली व सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनीही जवानांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले. या जवानांमध्ये असलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.