गडचिरोली - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये बहुप्रतीक्षित शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी थाळीची चव चाखली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनीही शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
हेही वाचा - 'शिवभोजन' योजनेतून गरीब व गरजू जनेतेची भूक भागणार - छगन भुजबळ
शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवभोजन देण्याचे काम बचतगटांना दिले आहे. शहरी भागात थाळीची किंमत ५० रुपये आणि ग्रामीण भागात ३५ रुपये ठेवली आहे. नागरिकांकडून केवळ १० रुपये घेतले जाणार आहेत. उर्वरित रक्कम शासन संबंधित बचत गटाला देणार आहे. १० रुपयात भोजन मिळणार असल्याने पहिल्या दिवशी नागरिकाची गर्दी दिसून आली.