गडचिरोली - शहरात येत्या २६ जानेवारीपासून शिवभोजन थाळी केंद्र सुरु होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन २६ जानेवारीला सकाळी चामोर्शी मार्गावरील एका कॉम्प्लेक्समध्ये, मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे.
हेही वाचा... उस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार 'शिवभोजन' थाळी
महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवभोजन देण्याचे काम बचतगटांना दिले जाणार आहे. शहरी भागात थाळीची किंमत ५० रुपये व ग्रामीण भागात ३५ रुपये ठेवली आहे. नागरिकांकडून केवळ १० रुपये घेतले जाणार आहेत. उर्वरित रक्कम शासन संबंधित बचत गटाला देणार आहे. १० रुपयात भोजन मिळणार असल्याने शिवभोजन थाळी कशी असेल, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र दरदिवशी मर्यादित भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला शिवभोजनाचा लाभ घेता येणार नाही.
हेही वाचा... 5 हजार मुलींनी एकत्रित 'युवती सक्षमीकरणाचे' घेतले प्रशिक्षण; 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
या केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा पुरवठा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.