ETV Bharat / state

...म्हणून राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे - राजीव सातव

छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तेथील जनतेला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काँग्रेसला विजय मिळताच अवघ्या २ दिवसांत कर्ज माफ करून शेतकऱ्यांना न्याय दिला.

भारतीय काँग्रेस कमीटीचे महासचिव खासदार राजीव सातव
author img

By

Published : Apr 6, 2019, 9:55 PM IST

गडचिरोली - शेतकरी, शेतमजूर व महिलांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याव, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांनी शनिवारी कुरखेडा येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-पिरिपा-शेकाप आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. खासदार सातव म्हणाले, छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तेथील जनतेला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काँग्रेसला विजय मिळताच अवघ्या २ दिवसांत कर्ज माफ करून शेतकऱ्यांना न्याय दिला. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत समाजातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये, कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक खात्यात दरमहा ६ हजार रूपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याच्या विधिमंडळ काँग्रेसचे उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देत लवकरच विजय वडेट्टीवारांना राहुल गांधींकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले.

भारतीय काँग्रेस कमीटीचे महासचिव खासदार राजीव सातव

यावेळी सभेला मार्गदर्शन करताना काँग्रेसचे विधिमंडळ उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करीत केंद्र सरकारच्या उज्ज्वला व मुद्रा योजनेची खिल्ली उडवली. काँग्रेस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वनजमिनीचे पट्टे देण्यात आले. मात्र, मोदी, फडणवीस सरकारच्या काळात वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय सर्वोच न्यायालयाने दिला असून, तो या निवडणुकीनंतर अंमलात येऊ शकतो. यासाठी मोदी सरकार उलथून टाका व काँग्रेसच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

याप्रसंगी राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनीही आपल्या भाषणात डॉ. नामदेव उसेंडी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांनी, तर आभार प्रदर्शन मनोज अग्रवाल यांनी केले.

Intro:शेतकरी, शेतमजूर व महिलांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे : राजीव सातव

गडचिरोली : शेतकरी, शेतमजूर व महिलांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे महासचिव खा.राजीव सातव यांनी शनिवारी कुरखेडा येथे केले Body:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील कांग्रेस-राष्ट्रवादी-पिरिपा-शेकाप आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. खा. सातव पुढे म्हणाले, छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कांग्रेसने तेथील जनतेला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काँग्रेसला विजय मिळताच अवघ्या दोन दिवसांत  कर्ज माफ करून शेतकऱ्यांना न्याय दिला. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत समाजातील प्रत्येक गोरगरीब कुटूंबाला वर्षाला ७२ हजार रुपये, कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक खात्यात दरमहा ६ हजार रूपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याच्या विधिमंडळ कांग्रेसचे उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देत लवकरच विजय वडेट्टीवाराना राहुल गांधीकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सभेला मार्गदर्शन करताना कांग्रेसचे विधिमंडळ उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करीत केंद्र सरकारच्या उज्ज्वला व मुद्रा योजनेची खिल्ली उडवली. कांग्रेस सरकारच्या काळात मोठया प्रमाणात वनजमिनीचे पट्टे देण्यात आले. मात्र, मोदी, फडणवीस सरकारच्या काळात वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय सर्वोच न्यायालयाने दिला असून, तो या निवडणुकीनंतर अंमलात येऊ शकतो. यासाठी मोदी सरकार उलथून टाका व कांग्रेसच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले
याप्रसंगी राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनीही आपल्या भाषणात डॉ. नामदेव उसेंडी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांनी, तर आभार प्रदर्शन मनोज अग्रवाल यांनी केले.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.