ETV Bharat / state

साडेसात लाख मतदारांना पोस्ट कार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती, टक्केवारी वाढण्याचा विश्वास - post card

मतदारांना पाठविण्यात आलेल्या पोस्टकार्डवर पहिल्या बाजूला मतदानाची तारीख व वेळ छापण्यात आली आहे. तर मागच्या भागावर मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणून कोणते दस्तऐवज सादर करु शकतो, त्या दस्तऐवजांची यादी देण्यात आली आहे. बहुतांश पोस्टकार्डचे वाटप करण्यात आले आहे.

साडेसात लाख मतदारांना पोस्ट कार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती : टक्केवारी वाढण्याचा विश्वास
author img

By

Published : Apr 10, 2019, 11:13 AM IST

गडचिरोली - ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील साडेसात लाख मतदारांना पोस्टकार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे घराबाहेर पडून मतदान करावे व आपला हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे.

मतदारांना पाठविण्यात आलेल्या पोस्टकार्डवर पहिल्या बाजूला मतदानाची तारीख व वेळ छापण्यात आली आहे. तर मागच्या भागावर मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणून कोणते दस्तऐवज सादर करु शकतो, त्या दस्तऐवजांची यादी देण्यात आली आहे. बहुतांश पोस्टकार्डचे वाटप करण्यात आले आहे. या पोस्टकार्डवर मराठी, बंगाली, माडिया व तेलगू भाषेत मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भूभागावर राहणाऱ्या विविध भाषिक मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

अहेरी, गडचिरोली, आरमोरी व आमगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर ब्रम्हपुरी व चिमूर मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजतापर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ४१०० मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, मोटारसायकल रॅली काढूनही जनजागृती करण्यात आली. मोटारसायकल रॅलीद्वारे जिल्ह्यातील २२ हजार नवमतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृतीसाठी ८७१ ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

७१ हजार लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला, तर ४७ हजार नागरिकांनी डेमो व्होट टाकले. काही घटकांसाठी मतदानाची विशेष व्यवस्था असून अंध, अपंग, गरोदर माता, स्तनदा माता, वृद्ध यांना मतदानासाठी रांगेत ठेवू नये. त्यासाठी त्यांना लवकरात लवकर मतदान करता यावे म्हणून एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. ज्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात २२०३ दिव्यांग मतदार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:साडेसात लाख मतदारांना पोस्ट कार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती : टक्केवारी वाढण्याचा विश्वास

गडचिरोली : येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील साडेसात लाख मतदारांना पोस्टकार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे घराबाहेर पडून मतदान करावे व व आपला हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे.Body:मतदारांना पाठविण्यात आलेल्या पोस्टकार्डवर पहिल्या बाजूला मतदानाची तारीख व वेळ छापण्यात आली आहे. तर मागच्या भागावर मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणून कोणते दस्तऐवज सादर करु शकतो, त्या दस्तऐवजांची यादी देण्यात आली आहे. बहुतांश पोस्टकार्ड वाटप करण्यात आले आहेत. या पोस्टकार्डवर मराठी, बंगाली, माडिया व तेलगू भाषेत मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भूभागावर राहणाऱ्या विविध भाषिक मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.

अहेरी, गडचिरोली, आरमोरी व आमगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत, तर ब्रम्हपुरी व चिमूर मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजतापर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ४१०० मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, मोटारसायकल रॅली काढूनही जनजागृती करण्यात आली. मोटारसायकल रॅलीद्वारे जिल्ह्यातील २२ हजार नवमतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृतीसाठी ८७१ ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

७१ हजार लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला, तर ४७ हजार नागरिकांनी डेमो व्होट टाकले.  काही घटकांसाठी मतदानाची विशेष व्यवस्था असून अंध, अपंग, गरोदर माता, स्तनदा माता, वृद्ध यांना मतदानासाठी रांगेत ठेवू नये. त्यासाठी त्यांना लवकरात लवकर मतदान करता यावे म्हणून एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. ज्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात २२०३ दिव्यांग मतदार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Conclusion:सोबत पोस्ट कार्ड चे फोटो आणि जिल्हाधिकारी यांचे कटवेज व बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.