ETV Bharat / state

गडचिरोलीतील हल्ला हे गु्प्तचर विभागाचे अपयश नाही - पोलीस महासंचालक जैस्वाल

सुबोधकुमार जैस्वाल म्हणाले, या हल्ल्यामध्ये १५ जवान तसेच एक वाहन चालक यांना वीरमरण आले. या घटनेचा तपास सुरु आहे. आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास क्विक रिस्पॉन्स टीम कुरडा पोलीस स्टेशनकडे जात असताना ही घटना घडली.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल
author img

By

Published : May 1, 2019, 3:44 PM IST

Updated : May 1, 2019, 4:09 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथे हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान तसेच एक वाहन चालक यांना वीरमरण आले. हा हल्ला म्हणजे गु्प्तचर विभागाचे अपयश नाही, असे पोलीस महासंचालक जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस महासंचालक जैस्वाल

जैस्वाल म्हणाले, दोन तासांपूर्वी ही घटना घडल्याने आमच्याकडे पूर्ण माहिती नाही. सध्या नक्षलवाद्यांशी दोन हात सुरू आहेत, आम्ही सर्व बाबी लक्षात घेऊन त्यावर कारवाई करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस अशा घटनांना सामोरे जाण्यास सक्षम आहे.

सर्व पोलीस खासगी वाहनाने जात असताना हा हल्ला झाला. ते या खाजगी वाहनांनी का गेले यांची नंतर मी माहिती घेईन. ही आमच्या दलासाठी सर्वात मोठी हानी आहे. लोकशाही उलथवून टाकणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे.

अनेक ठिकाणांहून पोलिसांची अतिरिक्त कुमक तेथे पाठवण्यात आली आहे. मतदकार्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः आज संध्याकाळी या ठिकाणी जाणार आहे, असेही पोलीस महासंचालक जैस्वाल म्हणाले.

Intro:Body:

news 01

Conclusion:
Last Updated : May 1, 2019, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.