ETV Bharat / state

गडचिरोली: पाथरगोटचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

सरकारने या गंभीर बाबीची कुठलीही दखल न घेता ग्रामस्थांनी फक्त आश्वासनाने देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. या सर्व बाबींची सरकारने दखल घेण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला.

ग्रामपंचायत निवडणूक बहिष्कार
ग्रामपंचायत निवडणूक बहिष्कार
author img

By

Published : Jan 15, 2021, 11:05 PM IST

Updated : Jan 15, 2021, 11:14 PM IST

गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील लोकसंख्या सतराशेच्या घरात असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केवळ 14 जणांनी मतदान केले. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

पाथरगोटा गावात केवळ 8 पुरुष आणि सहा महिलांनी मतदान केले. गावात दोन मतदान केंद्र होते. यामध्ये एका बुथवर 19 वर 2 पुरुष आणि 1 स्त्री तर दुसऱ्या बुथवर 20 वर 6 पुरुष आणि 5 स्त्रियांनी मतदान केले. विशेष म्हणजे, यात केवळ उमेदवार आणि त्यांचे बुथ प्रतिनिधी यांचा समावेश होता.

पाथरगोटचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव 30 वर्षांपासून धूळखात-
आरमोरी तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर पाथरगोटा गाव आहे. मागील ३० वर्षांपासून पाथरगोटा गावाने गट ग्रामपंचायत असलेल्या पळसगाव गट ग्रामपंचायतपासून वेगळी ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी करण्य़ात येत आहे. गामस्थांनी अनेक आंदोलन व निवेदनातून सरकारला ग्रामपंचायत वेगळी करण्याची मागणी केली. ग्रामसभातून अनेक निवेदन शासनस्तरावर पाठविण्यात आले. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत वेगळा करण्याचा प्रस्ताव सरकारी दरबारी धूळखात पडला आहे.

मतदान केंद्रात शुकशुकाट
मतदान केंद्रात शुकशुकाट

हेही वाचा-पुणे : कुसेगाव येथे मतदान प्रक्रियेला गालबोट; दोन गटात किरकोळ हाणामारी

पळसगावाची हुकूमशाही चालत असल्याचा आरोप-
मागील लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि टाळेबंदी अगोदर जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून ग्रामपंचायत वेगळी करण्यासाठी मागणी केली. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र शासन, प्रशासन याकडे दुर्लक्ष केले. पाथरगोटा गावाची लोकसंख्या १७०० च्या घरात असून ग्रामपंचायत पळसगाव पेक्षाही गावाची लोकसंख्या जास्त आहे. मात्र, असे असूनही ग्रामपंचायत पेसाअंतर्गत येत असल्याने बहुसंख्य इतर मागासवर्गीय मतदार असताना सरपंचपदासाठी नेहमीच निराशा झाली आहे. त्यामुळे सरपंच आणि इतर सदस्य हे पळसगाव येथील असल्याने ग्रामपंचायतमध्ये फक्त पळसगावाची हुकूमशाही चालते. सरकारस्तरावरील संपूर्ण विकास निधी हा पळसगावात खर्च होत आहे. पाथरगोटा गाव विकासकामापासून कोसो दूर असल्याचे ग्रामस्थ संतोष प्रधान यांनी म्हटले आहे.

बहिष्काराचे फलक
बहिष्काराचे फलक

हेही वाचा-गडचिरोली : जिल्ह्यात सरासरी 85 टक्के मतदान; 22 ला होणार मतमोजणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा-
गावात कित्येक वर्षांपासून पिण्याचे शुद्ध पाणी, नाली, रस्ते, घरकुल, शेततळे, आरोग्य, स्मशानभूमीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र, सरकारने या गंभीर बाबीची कुठलीही दखल न घेता ग्रामस्थांनी फक्त आश्वासनाने देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. या सर्व बाबींची सरकारने दखल घेण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला. यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रशासनाच्या मनधरणीनंतरही गामस्थ ठाम-
स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी पाथरगोटा येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यापूर्वी दिला होता. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने अनेकवेळा केला. त्यानंतरही ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे आज केवळ 14 जणांनी मतदान केले, अशी माहिती आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी दिली.

जिल्ह्यात सरासरी 85 टक्क्यांहून अधिक मतदान-

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 170 ग्रामपंचायतीसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील जिल्हा असल्याने इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान होते. अंतिम मतदानाची आकडेवारी अद्याप हाती आलेली नसली तरी सरासरी 85% पेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे.

Last Updated : Jan 15, 2021, 11:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.