गडचिरोली - देशातील ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत करून, त्या आरक्षणात मराठा समाजासह अन्य कोणत्याही प्रवर्गाचा समावेश करू नये, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या २२ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर १ लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा धडकणार आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची सभा गडचिरोली येथे पार पडली. या सभेत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मागण्यांसाठी काढण्यात येणार मोर्चा
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी आरक्षणात मराठा समाजासह इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर इत्यादी जिल्ह्यांतील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, एससी,एसटी समाजाप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 22 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे.
सभेला यांची होती उपस्थिती
या सभेला रमाकांत ठेंगरी, सुरेश भांडेकर, दहेलकर पाटील, अजय कंकडलावार, रमेश बारसागडे, प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर मशाखेत्री, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रा.शेषराव येलेकर, भास्कर बुरे, पंकज खोबे, अनिल कोठारे, प्रशांत वाघरे, सतीश विधाते, दादाजी चापले, प्रा देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, रमेश भुरसे, प्रा.डॉ रामचंद्र वासेकर, मारोती दुधबावरे, पांडुरंग भांडेकर, दत्तात्रय खरवडे, राजेंद्र उरकुडे, यांच्यासह ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.