ETV Bharat / state

..तोपर्यंत सुरजागड प्रकल्पातील एकही दगड जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही- नाना पटोले - काँग्रेसचे आंदोलन

गडचिरोलीत लोहखनिजावरील प्रक्रिया उद्योग लाॅयड्स कंपनी स्थापन करणार नाही, तोपर्यंत सुरजागडचा एकही दगड जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. ही काँग्रेसची भूमिका असून आगामी दोन ते तीन दिवसात याबद्दल रणनीती ठरवली जाईल, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Jun 7, 2021, 10:04 PM IST

गडचिरोली - सुरजागडच्या लोहखनिजावर गडचिरोली जिल्ह्यातच प्रक्रिया करणारा प्रकल्प व्हावा आणि त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. ही आपली आधीही भूमिका होती व ती आजही कायम आहे. जोपर्यंत गडचिरोलीत लोहखनिजावरील प्रक्रिया उद्योग लाॅयड्स कंपनी स्थापन करणार नाही, तोपर्यंत सुरजागडचा एकही दगड जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. ही काँग्रेसची भूमिका असून आगामी दोन ते तीन दिवसात याबद्दल रणनीती ठरवली जाईल, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

'गडचिरोलीत उद्योग स्थापन झाल्याशिवाय सुरजागड प्रकल्पातील एकही दगड नेऊ देणार नाही'

'दोन ते तीन दिवसात रणनिती ठरवली जाईल'

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी गडचिरोली दौऱ्यावर पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधातील आंदोलनाची सुरूवात करण्यासाठी आले होते. यावेळी सुरजागडच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या उत्खननासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देत होते. नाना पटोले पूढे म्हणाले की, ते विधानसभेचे अध्यक्ष असताना झालेल्या बैठकीत सुद्धा लाॅयड्सचा प्रक्रिया उद्योग गडचिरोलीत स्थापन होऊन स्थानिकांना त्यात प्राथमिकतेने रोजगार उपलब्ध व्हावा. इथले लोहखनिज जिल्ह्याबाहेर जाऊ नये अशीच भूमिका घेतली होती व आपण आजही त्यावर कायम आहोत. सुरजागडच्या लोहखनिजावर जिल्ह्यातच प्रक्रिया व्हावी. ही काँग्रेसची अधिकृत भूमिका असून आगामी दोन ते तीन दिवसात यावर रणनिती ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Pune Fire: पिरंगुट MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग, 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.