ETV Bharat / state

गडचिरोली : चकमकीत ठार नक्षलवाद्यांची ओळख पटली; 13 जणांवर होते 60 लाखांचे बक्षीस - गडचिरोली ताज्या बातम्या

शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसूर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या 13 नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात 6 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. तसेच त्यांच्यावर 60 लाखांचे बक्षिस होते.

gadchiroli clashes between Naxals and police
गडचिरोली : चकमकीत ठार नक्षलवाद्यांची ओळख पटली; 13 जणांवर होते 60 लाखांचे बक्षीस
author img

By

Published : May 21, 2021, 9:28 PM IST

Updated : May 21, 2021, 10:37 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसूर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलाला यश आले. ठार झालेल्या 13 नक्षलवाद्यांची ओळख पटली असून 6 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. या 13 जणांवर एकूण 60 लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती गडचिरोली पोलीस दलाने दिली आहे.

माहिती घेताना गृहमंत्री

अशी आहे 13 नक्षलवाद्यांची ओळख -

नंदिनी ऊर्फ प्रेमवती मडावी ही कसनसूर दलममध्ये एसीएम म्हणून कार्यरत होती. तिच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते. सतीश ऊर्फ अडवे देऊ मोहंदा हा कंपनी4 चा डीव्हिसीएम होता. त्याच्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. किशोर कर्फ शिवा ऊर्फ शिवाजी बारसू गावडे हा कंपनी 4 चा पीएम होता. त्याच्यावर 4 लाखांचे बक्षीस होते. रुपेश ऊर्फ लींगा मस्तरी गावडे हा कसनसूर दलममध्ये उपकंमाडर होता. त्याच्यावर 6 लाख रुपये बक्षीस होते. सेवंती हिडो ही कसनसूर दलामध्ये पीएम होती. तिच्यावर 2 लाख रुपये बक्षीस होते. किशोर होळी हा पैदी एरीयाचा जनमिलीशिया म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर 2 लाख रुपये बक्षीस होते. क्रांती ऊर्फ मैना ऊर्फ रीना माहो मट्टामी ही कसनसूर दलमच्या पीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर 2 लाख रुपये बक्षीस होते. गुनी उर्फ बुकली धानु हिचामी ही कंपनी 4 मध्ये पिपिसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर 4 लाख रुपये बक्षीस होते. रजनी ओडी ही कसनसूर दलमच्या पीएम पदावर होती. तिच्यावर 2 लाख रुपये बक्षीस होते. उमेश परसा हा एसीएम म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर 6 लाख रुपये बक्षीस होते. सगुना ऊर्फ बसंती ऊर्फ वत्सला लालू नरोटे ही चातगांव दलमची पीएम होती. तिच्यावर 2 लाख रुपये बक्षीस होते. सोमरी ऊर्फ सुनिता ऊर्फ सचिता पापय्या नैताम ही कसनसूर दलाची सदस्य होती. तिच्यावर 1लाख रुपये बक्षीस होते. तर रोहीत ऊर्फ मनेश ऊर्फ मानस ऊर्फ सोनारु करामी हा कसनसूर दलात पीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर 2 लाख रुपये बक्षीस शासनाने जाहीर केले होते.

हेही वाचा - बार्ज पी-305 : दुर्घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार; प्रकरणाची चौकशी होणार - मंत्री अस्लम शेख

Last Updated : May 21, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.