गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा तांडव सुरूच, पुन्हा केली वाहनांची जाळपोळ - attack
एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथे रस्ता कामावरील मिक्सर मशीन आणि पाण्याच्या टँकरची जाळपोळ केल्याची घटना घडली. गेल्या 10 दिवसातील नक्षल्यांनी घडवून आणलेली ही पाचवी घटना आहे.
गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा कहर अद्यापही सुरुच आहे. एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथे रस्ता कामावरील मिक्सर मशीन आणि पाण्याच्या टँकरची जाळपोळ केल्याची घटना घडली. गेल्या १० दिवसातील नक्षल्यांनी घडवून आणलेली ही पाचवी घटना आहे.
1 मे ला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये 15 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर नक्षलवादी आणखी आक्रमक झाले आहेत. गेल्या रविवारी भामरागड तालुक्यात एकाची हत्या केली होती. त्यानंतर 24 तासातच पुन्हा एटापल्ली तालुक्यातील जंभिया गट्टा येथील एका नागरिकाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी हत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली होती.
महाराष्ट्र दिनाच्या पहाटे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे 27 वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनांना 1 मे ला नक्षलवाद्यांनी लक्ष करून भूसुरुंगस्फोट घडवला होता. या स्फोटात 15 पोलीस जवानांसह एक खाजगी वाहन चालक शहीद झाले. या घटना ताज्या असतानाच रविवारी भामरागड तालुक्यातील एकाची तर सोमवारी एटापल्ली तालुक्यातील एकाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा जाळपोळ केल्याचे समोर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण भागात नक्षल्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
Gadchiroli
Conclusion: