ETV Bharat / state

Naxalite Surrender Gadchiroli : 20 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली जोडप्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण - नक्षली जोडप्याचे आत्मसमर्पण गडचिरोली

सध्या नक्षलवाद्यांचा घातपात कालावधी सुरू आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ( Gadchiroli Police Big Achievement ) 20 लाख बक्षीस असलेल्या एका नक्षल जोडप्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. ( Naxalite Couple Surrendred Gadchiroli Police ) यात दीपक इष्टाम (34) या डिव्हिजनल कमांडरचा समावेश असून त्याने पत्नी शामबत्ती अलाम (25) सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

Naxalite Surrender Gadchiroli
नक्षली जोडप्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
author img

By

Published : Mar 16, 2022, 3:21 PM IST

Updated : Mar 16, 2022, 4:51 PM IST

गडचिरोली - सध्या नक्षलवाद्यांचा घातपात कालावधी सुरू आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ( Gadchiroli Police Big Achievement ) 20 लाख बक्षीस असलेल्या एका नक्षल जोडप्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. ( Naxalite Couple Surrendred Gadchiroli Police ) यात दीपक इष्टाम (34) या डिव्हिजनल कमांडरचा समावेश असून त्याने पत्नी शामबत्ती अलाम (25) सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित कमांडर दीपक इष्टाम आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची प्रतिक्रिया

21 च्या DVC पदावर पोहोचला -

मूळ एटापल्ली तालुक्यातील गडेरी गावचा कमांडर दिपक 2001 मध्ये चळवळीत सामील झाला होता. त्याच्यावर 16 लाखांचे बक्षीस ठेवले गेले होते. विविध महत्वपूर्ण पदे सांभाळत तो प्लाटून 21 च्या DVC पदावर पोहोचला. छत्तीसगडमध्ये त्याने केलेल्या 6 मोठ्या विविध नक्षली कारवायात 31 जवान मारले गेले.

छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील मूळची त्याची पत्नी श्यामबत्तीवर 2 गुन्हे दाखल आहेत. प्लाटून 21मधील या नक्षलीवर 4 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. गडचिरोली पोलिसांपुढे 2019 ते आजवर 45 नक्षल्यांनी केले आत्मसमर्पण केले आहे. यात पाच डीव्हीसी-2, दलम - 3 कमांडर व 35 नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - MNS attack IPL Bus Mumbai : वाहतुकीचे काम स्थानिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली

जिल्ह्यातील आजवरची एकूण आत्मसमर्पित नक्षल संख्या 649 वर पोहोचली आहे. वीस वर्षे नक्षल चळवळीत काम करून देखील यातील फोलपणा लक्षात आल्याने आपण आत्मसमर्पण करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया कमांडर दिपक याने याप्रसंगी व्यक्त केली गेली. वीस वर्षे तो स्वतःच्या कुटुंबाला ही भेटू शकलेला नाही.

Last Updated : Mar 16, 2022, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.