ETV Bharat / state

गडचिरोली: कुनघाडा फाट्यावर आढळले नक्षल बॅनर; नागरिकांमध्ये दहशत - Bhukal Saghatana anniversary

गडचिरोली-चामोर्शी हा मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. मात्र, आज सकाळच्या सुमारास कुनघाडा फाट्यावर नक्षलवाद्यांचे कापडी लाल रंगाचे बॅनर आढळून आले.

कुनघाडा फाट्यावर आढळले नक्षल बॅनर
कुनघाडा फाट्यावर आढळले नक्षल बॅनर
author img

By

Published : Feb 9, 2021, 8:49 PM IST

गडचिरोली - चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा फाट्यावर आज सकाळच्या सुमारास नक्षलवादी बॅनर आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. मुख्य रहदारीच्या मार्गावर नक्षल बॅनर आढळल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

गडचिरोली-चामोर्शी हा मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. मात्र, आज सकाळच्या सुमारास कुनघाडा फाट्यावर नक्षलवाद्यांचे कापडी लाल रंगाचे बॅनर आढळून आले. ही घटना लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. चामोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नक्षल्यांचे बॅनर ताब्यात घेतले. 10 फेब्रुवारीला भूमकाल संघटनेचा स्थापना वर्ष साजरा करण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून नक्षलवादी संघटनेने केले आहे. यावर भाकपा माओवादी असा उल्लेख आहे.

हेही वाचा-19 ते 21 फेब्रुवारी 2021 दरम्यान रंगणार वसंतोत्सव

नक्षलवाद्यांकडून यापूर्वीही बॅनर व पत्रकाच्या माध्यमातून विविध आवाहन करून नागरिकांना घाबरविण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा-'जालना लोकसभेत रावसाहेब दानवेंना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

दरम्यान, कोरची तालुक्यातील जिवता रामटेके या 45 वर्षाच्या नागरिकाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एप्रिल २०२० मध्ये गोळी झाडून हत्या केली होती. खरे तर रामटेके यांचा पोलिसांशी साधा संबंधही आलेला नाही. मागील काही घटना बघितल्यास कोणाचीही हत्या करतांना पोलिसाचे खबरी असल्याचे आरोप लावणे नक्षलवाद्यांची एक प्रकारे फॅशनच झाली आहे, असा आरोप भूमकाल संघटनेने त्यावेळी केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.