ETV Bharat / state

लाहेरी मार्गावर आढळले नक्षली बॅनर; क्रांतिकारी सप्ताह पाळण्याचे आवाहन

नक्षलवाद्यांच्या गडचिरोलीमधील भामरागड एरिया कमिटीचा उल्लेख असलेली पत्रके आणि बॅनर हिंदेवाडा ते कुकामेटा परिसरात आढळले. हे बॅनर आढळल्याने मोठी खळबळ उडाली. बॅनरमध्ये 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान क्रांतिकारी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

naxal banner found at latheri road
लाहेरी मार्गावर आढळले नक्षली बॅनर
author img

By

Published : Sep 16, 2020, 9:35 PM IST

गडचिरोली- जिल्हातील भामरागड तालुक्यातील लाहेरी मार्गावरील हिंदेवाडा ते कुकामेटा दरम्यान नक्षली बॅनर आणि पत्रके आढळून आली आहेत. मुख्य मार्गावर झाडे तोडून टाकल्याचे आढळून आले. याठिकाणी बॅनर बांधलेले आढळले.

हेही वाचा-गोंडवाना विद्यापीठाचे 95 टक्के विद्यार्थी 'ऑनलाइन' तर 706 विद्यार्थी देणार 'ऑफलाइन' परीक्षा

बॅनर आणि पत्रकातून भारताच्या कम्युनिस्ट पार्टी(माओवादी) च्या 16 वा स्थापना वर्षानिमित्त 21 ते 27 सप्टेंबरपर्यंत क्रांतिकारी सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भामरागड एरिया कमिटी, असे पत्रकावर आणि बॅनर वर नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यावर बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात गोंदिया जिल्ह्यातही नक्षल्यांचे बॅनर आढळून आली आहेत.

हेही वाचा-प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 'त्या' कुटुंबाला मिळाला आर्थिक आधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.