ETV Bharat / state

नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या जवानांचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील मुरुमभुशी गावाजवळ गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाचे जवान शुक्रवारी नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मात्र नक्षलवाद्यांसोबत दोन वेळा झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलातील एक जवान जखमी झाला.

नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या जवानांचे जल्लोषात स्वागत
नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या जवानांचे जल्लोषात स्वागत
author img

By

Published : Mar 7, 2021, 3:38 AM IST

गडचिरोली - महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील मुरुमभुशी गावाजवळ गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाचे जवान शुक्रवारी नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मात्र नक्षलवाद्यांसोबत दोन वेळा झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलातील एक जवान जखमी झाला. तब्बल चोवीस तासानंतर विशेष अभियान पथकाचे जवान आज शनिवारी पोलीस मुख्यालयात पोहोचले तेव्हा या जवानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नक्षलवाद्यांच्या शस्त्र तयार करण्याच्या मशिनरी केल्या नष्ट

गडचिरोली पोलीस दलातील सी-60 दलाचे जवान घनदाट जंगलात अभियान राबवत असताना, लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार केला. तेव्हा विशेष अभियान पथकाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. त्यावेळी नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. त्या भागात शोध मोहीम राबविली असता, त्या परिसरातील एका कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांच्या शस्त्र तयार करण्याच्या मशिनरी आढळून आल्या. सदर मशिनरी पोलीस जवानांनी उद्ध्वस्त केल्या. या ठिकाणावरुन जवान परत येत असतांना वाटेत नक्षलवाद्यांनी पुन्हा पोलीस पथकांवर गोळीबार केला. त्यांना पोलीस पथकाने चोख प्रत्युत्तर दिले.

नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या जवानांचे जल्लोषात स्वागत

जवानांचा डीजेच्या तालावर ठेका

भामरागडच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या विशेष अभियान पथकाच्या दोन्ही तुकड्या आज शनिवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोहोचल्या. तेव्हा जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर डीजेच्या तालावर जल्लोष साजरा करताना जवानांनीही ठेका धरला. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जवानांशी थेट संवाद साधून घटनेची चौकशी केली आणि जवानांचे कौतुक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.