गडचिरोली - तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगट्टा कालेश्वर या सिंचन प्रकल्पाच्या ठिकाणी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सोमवारी निदर्शने केली. प्रकल्पबाधित सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास आपण प्रकल्पाच्या पाण्यात उडी मारु, असा इशारा आत्राम यांनी यावेळी दिला.
तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर मेडीगट्टा बॅरेज उभारला. या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा तेलंगणातील शेतीला होणार असला तरी बूडीत क्षेत्र मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. तेलंगणा सरकारने कोणतीही कल्पना न देता आणि जमीन भूसंपादन न करता प्रकल्पाचे पाणी अडवले. यामुळे सिरोंचा तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रब्बी पीकं आता पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार प्रति रोष होता.
हेही वाचा - गडचिरोली पोलिसांचा नक्षलवाद्यांच्या तळावर हल्ला; 1 नक्षलवादी ठार
याप्रकरणी सोमवारी प्रकल्पस्थळी तेलंगणा सरकारच्या विरोधात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नागरिकांसोबत घोषणाबाजी करून निदर्शने केली. त्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तणाव निर्माण झाला होता. तेलंगणाच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या सिरोंचा तालुक्यातील १० गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धर्मराव बाबांच्या यांच्या निदर्शनामुळे तेलंगणा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा - गडचिरोलीत गतीमंद युवतीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी; पाच नराधम जेरबंद