ETV Bharat / state

Gadchiroli encounter पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोली पोलिसांचे कौतुक, 51 लाखांच्या बक्षिसाची घोषणा - prize Gadchiroli Police

गडचिरोली पोलीस दलाने (Gadchiroli Police) केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे (minister eknath shinde) यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली.

eknath shinde announced prize to Gadchiroli Police
गडचिरोली पोलीस बक्षीस एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 15, 2021, 10:34 PM IST

गडचिरोली - गडचिरोली पोलीस दलाने (Gadchiroli Police) केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे (minister eknath shinde) यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल, असे ते यावेळी म्हणाले.

माहिती देताना पालकमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा - milind teltumbde death मिलिंद तेलतुंबडे याच्या खात्म्याने तीन राज्यांना फायदा होणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शनिवारी गडचिरोली - छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस - नक्षल चकमकीत (Gadchiroli Naxals encounter) सी-60 जवानांकडून (c 60 commandos) 26 नक्षल मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करण्याकरीता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी 60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी - 60 जवानांसह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.

कारवाईमुळे देशभरातील नक्षली संघटनांना जबर हादरा

पोलिसांच्या अडचणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून सोडविल्या जाईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला (Naxal movement) जबरदस्त हादरा बसलेला आहे. तसेच, या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत त्यांनाही जबर हादरा बसला असल्याचे ते एकनाथ शिंदे म्हणाले.

नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी आपल्या संबोधनादरम्यान दिली. यावेळी पोलिसांकडून असलेल्या त्यांच्या मागण्या मी सोबत घेऊन जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काळात जलद गतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

नुकत्याच झालेल्या नक्षली चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले. यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्र पुरवठा मी पाहिला असून अतिशय मोठ्या प्रमाणात नक्षली मिलिंद तेलतुंबडे याची सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा त्याला मारण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले, हे कौतुकास्पद आहे. यामुळे महाराष्ट्रासह इतर नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींना धडा शिकवण्यात आपल्या राज्याला यश आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले व अभिनंदनही केले.

हेही वाचा - gadchiroli encounter : 16 नक्षलवाद्यांची ओळख पटली; 10 जणांची ओळख पटविणे सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.