गडचिरोली - शहरात पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव कार्यक्रम सोमवारी पार पडला. यादरम्यान गडचिरोली नगर पद्मशाली समाजाकडून शहरात कलश आणि मार्कंडेश्वर प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.
हेही वाचा - 'बहीण म्हणून विनंती करतो, पंकजा मुंडेंनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा'
मुरलीधर पस्पुनवार यांच्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीनंतर याच ठिकाणी मार्कंडेय महामुनींची पूजा आणि आरती करण्यात आली. हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हेही वाचा - विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श