ETV Bharat / state

कृष्णार गाव लखपतीच्या वाटेवर...! सूक्ष्म नियोजनाला सुरुवात....! - कृष्णार गाव लखपतीच्या वाटेवर

गावातील कुटुंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा वापर करून वैयक्तिक लाभाच्या कामाची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे. गावाचा सर्वांगीण विकास लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता,आरोग्य,शिक्षण, पर्यावरण, जल व मृद संधारण आणि पायाभूत सुविधाच्या विकासाशी निगडित कामांचा समावेश करून गावातील सर्व कुटुंबांना वर्षभर पुरेल इतक्या रोजगाराची निर्मिती करण्यासाठी अकुशल व कुशल चे प्रमाण लक्षात घेऊन दहा वर्षात प्रत्येक कुटुंब लखपती करण्यासाठी तसे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

krushnar
कृष्णार गाव लखपतीच्या वाटेवर.
author img

By

Published : Apr 28, 2022, 10:44 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील अति दुर्गम संवेदनशील नक्षलग्रस्त भागातील भामरागड पं.स स्तरावरील आणि संपूर्ण आदिवासी बहुल असलेल्या मौजे कृष्णार गावाची 'मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध' या योजनेसाठी निवड करण्यात आली. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत समृध्द गाव करण्यासाठी भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायती अंतर्गत कृष्णार या गावाची निवड करुन गावकऱ्यांना भविष्यात लखोपती करण्याचे नियोजन करण्यात आले.

विशेष ग्रामसभा घेऊन सूक्ष्म नियोजन - या गावी भेट देऊन 23 एप्रिल 2022 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत याचे सूक्ष्म नियोजन तयार करण्याचे काम सुरू आहे. आरेवाडा ग्रामपंचायतचे सरपंच तानुजी सडमेक यांचे अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत गट विकास अधिकारी स्वप्निल मगदुम, सिंचाई उपविभाग अहेरीचे शाखा अभियंता किशोर वाळके, कृषी सहाय्यक तिम्मा, स्वच्छ्ता अभियानाचे समन्वयक प्रभाकर दुर्गे, ग्रामसेवक सुरेंद्र तोकलवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गज्जलवार व गावकरी उपस्थित होते.

दहा वर्षात प्रत्येक कुटुंब होणार लखपती - गावातील कुटुंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा वापर करून वैयक्तिक लाभाच्या कामाची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे. गावाचा सर्वांगीण विकास लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता,आरोग्य,शिक्षण, पर्यावरण, जल व मृद संधारण आणि पायाभूत सुविधाच्या विकासाशी निगडित कामांचा समावेश करून गावातील सर्व कुटुंबांना वर्षभर पुरेल इतक्या रोजगाराची निर्मिती करण्यासाठी अकुशल व कुशल चे प्रमाण लक्षात घेऊन दहा वर्षात प्रत्येक कुटुंब लखपती करण्यासाठी तसे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.याप्रसंगी गट विकास अधिकारी स्वप्निल मगदुम व शाखा अभियंता किशोर वाळके यांनी योग्य मार्गदर्शन केले. दरम्यान, सर्व ग्रामस्थांसह गाव फेरी व शिवार फेरी काढण्यात येऊन योग्य कामाची निवड करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.