गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. येथे आज (16 एप्रिल) 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हयात 434 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर आज 183 जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 14019 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11249वर पोहोचली आहे. सध्या 2585 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 185 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.44 टक्के तर मृत्यू दर 1.32 टक्के झाला आहे.
या तालुक्यात आढळले रुग्ण -
नवीन 434 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 165, अहेरी तालुक्यातील 68, आरमोरी 33, भामरागड तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 20, धानोरा तालुक्यातील 21, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील 17, मुलचेरा तालुक्यातील 04, सिरोंचा तालुक्यातील 09 तर वडसा तालुक्यातील 42 जणांचा समावेश आहे. तर
आज कोरोनामुक्त झालेल्या 183 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 75, अहेरी 14, आरमोरी 14, भामरागड 11, चामोर्शी 08, धानोरा 09, एटापल्ली 07, मुलचेरा 03, सिरोंचा 05, कोरची 04, कुरखेडा 06, तसेच वडसा 27 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे.