गडचिरोली - गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार हजेरी लावली. गुरुवारी (आज) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने जिल्ह्यातील गावांना याचा मोठा फटका बसला आहे.
24 तासात 22 मिलिमीटर पावसाची नोंद
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. सर्वाधिक पाऊस देसाईगंज तालुक्यात 120 मिलिमीटर एवढा नोंदविला गेला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे गडचिरोली शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. तर नगर पालिका इमारत असलेल्या ठिकाणाला तलावाचे स्वरूप आले आहे. शिवाय शहरातील विविध भागांमध्ये पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसल्याने रस्त्याचे रूपांतर नद्यांमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. संततधारमुळे नागरिकही त्रस्त झाले आहे.
हेही वाचा -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेव्हा डोसा बनवतात....पाहा व्हिडिओ